
Ganesh Chaturthi 2025: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशभक्त या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. घराघरांसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन केले जाते. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे? शुभ मुहूर्त काय आहे? बाप्पाची पूजा कशी करावी? पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा? यासह अन्य महत्त्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेऊया...
गणेश चतुर्थी कधी आहे, 26 ऑगस्ट की 27 ऑगस्ट? | When Is Ganesh Chaturthi 2025?
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीस 26 ऑगस्ट दुपारी 1.54 वाजता सुरुवात होत आहे आणि 27 ऑगस्ट दुपारी 3.44 वाजता तिथी समाप्त होतेय. उदया तिथीनुसार गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त (Ganesh Murti Sthapana Shubh Muhurat)
पंचागानुसार गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजीचे शुभ मुहूर्त
- सकाळी 6.30 वाजेपासून ते 9.30 वाजेपर्यंत असेल
- सकाळी 11.10 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल
- दुपारी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
गणपतीची मूर्ती कशी असावी?
- गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असावी.
- मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट उंच असावी
- मूर्ती शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांचा वापर करुन साकारलेली असावी.
गणेश मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी ?
- गणेश मूर्तीच्या पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्यावर तांदूळ ठेवल्यानंतर मूर्ती ठेवावी.
- आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीग करावा आणि त्यावर मूर्ती ठेवावी.
गणेश मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे?
गणेश मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी.
पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असेल, याची काळजी घ्यावी.
गणपतीच्या पूजेचे साहित्य
हळदकुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने 15, गूळ, खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप,मध, साखर, शेंदूर, गंध, जानवे, कापसाची वस्त्रे (गणरायासाठी लाल रंगाची), कापूर, उदबत्ती, श्रीफळ, खारीक, बदाम, फळे, सुटी नाणी पाच रुपयांची दक्षिणा
गणपतीच्या पूजेची 21 फुले
- जास्वंद
- पांढरे कमळ
- मधुमालती
- जाई
- सोनचाफा
- केवडा
- बकुळ
- सुपारी
- उंडी
- नागकेशर
- मोगरा
- धोतरा
- कण्हेरी
- प्राजक्त
- चवई
- नांदुरकी
- गोविंद
- मोहोर
- शतपत्र
- नानाविध
- तांबडे कमळ
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी 2025 कधी आहे? जाणून घ्या प्राणप्रतिष्ठा विधी, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख)
गणपतीच्या पूजेच्या 21 पत्री
- दुर्वा
- मधुमालती
- बोरीचे पान
- बेल
- माका
- धोतरा
- आघाडा
- तुळस
- डोलरी
- कण्हेर
- शमी
- अर्जुनसादडा
- रुई
- जाई
- विष्णुक्रांता
- डाळिंब
- देवदार
- केवडा
- मोरवा
- पिंपळ
- अगस्ती
श्री गणेश पूजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- पूजा करताना सर्व साहित्य पूजेच्या ठिकाणी आणून ठेवावे.
- पूजेला बसण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.
- गणपतीच्या मूर्तीचे पूर्व, पश्चिम किंवा उत्तर यापैकी एका दिशेकडे मुख करून ठेवावे.
- दरवाज्यावर आंब्याच्या पाच पानांच्या डहाळ्या बांधाव्या.
- पूजेच्या वेळेस स्वच्छ धोतर किंवा पीतांबर वगैरे सोवळे वस्त्र नेसावे. अन्य वस्त्र अंगावर घ्यावे.
- गणपतीला नीरांजन, उदबत्ती, कापूपर आरतीने ओवाळताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर आणि वरून उजवीकडून खालील बाजूने अशी गणपती मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी.
- डाव्या हाताने घंटानाद करावा.
- प्रदक्षिणा करताना स्वतःभोवती उजवीकडून फिरावे. त्या वेळेस हात जोडलेले असावे. विड्याची पाने उताणी आणि डेख गणपतीकडे करून समोर ठेवावी. वर सुपारी ठेवावी.
- श्रीफळाची शेंडी गणपती मूर्तीकडे करून ठेवा. समई डाव्या बाजूस आणि तुपाचा दिवा (नीरांजन) उजव्या बाजूस ठेवावे.
- गणेश मूर्तीच्या डाव्या बाजूस शंख ठेवा. गणपती मूर्तीला अनामिकेने गंध लावावे.
- कुंकू, अक्षता उजव्या हाताची अनामिका, मधले बोट आणि अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात.
- पूजा करताना गणपती मूर्तीवर दुर्वांनी किंचित पाणी शिंपडावे.
- दूर्वा आपल्याकडे अग्र करून गणपतीला वाहाव्यात.
- अभिषेक करताना गणपतीचे आवाहन करून सुपारीचा उपयोग करावा.
- प्राणप्रतिष्ठा, अंगपूजा ही फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच करावी.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?)
षोडशोपचारी पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1.आवाहन 2.आसन 3.पाद्य 4.अर्घ्य 5.आचमन 6. स्नान 7. वस्त्र 8. उपवस्त्र 9. गंध 10. पुष्प 11. धूप 12. दीप 13. नैवेद्य 14. प्रदक्षिणा 15. नमस्कार 16. मंत्रपुष्प
षोडशोपचारे पूजा करणे अशक्य असल्यास पंचोपचार पूजा करावी
1. गंध 2. पुष्प 3. धूप 4. दीप 5. नैवेद्य
गणरायाच्या अंगपूजेचा मंत्रॐ श्रीगणेश्वराय नमः । पादौ पूजयामि। (पाय)
ॐ विघ्नराजाय नमः। जानुनी पूजयामि । (ढोपरे)
ॐ आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि। (मांड्या)
ॐ हेरंबाय नमः। कटी पूजयामि। (कंबर)
ॐ कामारिसूनवे नमः । नाभि पूजयामि। (नाभी)
ॐ लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। (पोट)
ॐ गौरीसुताय नमः। स्तनौ पूजयामि। (स्तन)
ॐ गणनायकाय नमः । हृदयं पूजयामि। (हृदयस्थान)
ॐ स्थूलकर्णाय नमः। कंठं पूजयामि । (कंठ)
ॐ स्कंदाग्रजाय नमः । स्कंधौ पूजयामि । (खांदे)
ॐ पाशहस्ताय नमः । हस्तान् पूजयामि । (चारी हात)
ॐ गजवक्त्राय नमः। वक्त्रं पूजयामि । (मुख)
ॐ विघ्नहर्ते नमः। ललाटं पूजयामि । (कपाळ)
ॐ सर्वेश्वराय नमः। शिरः पूजयामि। (शीर्ष)
ॐ गणाधिपाय नमः। सर्वांगं पूजयामि। (सर्वांगावर)
गणपतीच्या मूर्तीवर पुढील नाममंत्रांनी एकेक करून पत्री वाहावी
सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि । (मधुमालती)
गणाधिपाय नमः। भृंगराजपत्रं समर्पयामि । (माका)
उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि । (बेल)
गजाननाय नमः । श्वेतदूर्वाकुरं समर्पयामि। (पांढऱ्या दुर्वा)
लंबोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि । (बोर)
हरसूनवे नमः। धत्तूरपत्रं समर्पयामि । (धोतऱ्याचे पान)
गजकर्णाय नमः। तुलसीपत्रं समर्पयामि । (तुळस)
वक्रतुण्डाय नमः। शमीपत्रं समर्पयामि । (शमी)
गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।(आघाडा)
एकदन्ताय नमः। बृहतीपत्रं समर्पयामि । (डोरली)
विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि । (कण्हेर)
कपिलाय नमः। अर्कपत्रं समर्पयामि। (रुई)
गजवक्त्राय नमः। अर्जुनपत्रं समर्पयामि। (अर्जुनसादडा)
विघ्नराजाय नमः । विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि। (विष्णुक्रांत)
बटवे नमः । दाडिमीपत्रं समर्पयामि। (डाळिंब)
सुराग्रजाय नमः । देवदारपत्रं समर्पयामि । (देवदार)
भालचंद्राय नमः । मरुबकपत्रं समर्पयामि। (मरवा)
हेरम्बाय नमः । अश्वत्थपत्रं समर्पयामि । (पिंपळ)
चतुर्भुजाय नमः। जातीपत्रं समर्पयामि । (जाई)
विनायकाय नमः । केतकीपत्रं समर्पयामि । (केवडा)
सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि । (अगस्त्य)
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हीच तुमच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली असली तरीही ब्राह्मणाच्या नावाने विडा, श्रीफळ, महादक्षिणा काढून ठेवावी. त्यावर गंध, अक्षता, पुष्प वाहावे. नंतर ते गुरुजींना नेऊन द्यावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world