सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन्  पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन 

देशाने आदर्श घ्यावा असा हा गणपती आहे.  

Advertisement
Read Time: 3 mins
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

महाराष्ट्रात विविधतेत एकदा आहे. धार्मिक परंपरांमध्येही हिंदू-मुस्लीम ऐक्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. सांगलीत चक्क मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जात आहे. (Ganesh Chaturthi)

देशाने आदर्श घ्यावा असा हा गणपती आहे.  सांगलीच्या गोटखिंडीत चक्क मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या 43 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. गेल्या इतक्या वर्षांपासून मशिदीत गणपती बसवला जातो. यंदाचं हे 44 वे वर्ष आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक असलेली प्रथा इतक्या वर्षांनंतर अद्यापही अबाधित आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील न्यू गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाकडून मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. मशिदीमध्ये (Sangli News) गणपती बसवण्याचे हे 44 वे वर्ष आहे. 

हिंदू व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत येथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून येथील गणेश उत्सवाकडे पाहिले जातं. गोटखिंडीत हिदुंचे सण मुस्लीम समाजाकडून साजरे केले जातात. तर मुस्लिमांच्या सण-उत्सवात हिंदू बांधव आनंदात सहभागी होतात.विशेष म्हणजे हिंदू-मुस्लीमांचे सण एकाच दिवशी आले  असतानाही दोन्ही सण एकाच ठिकाणी आनंदात केल्याचा इतिहास आहे. या  गावात गेल्या 43 वर्षांपासून मशिदीत गणपती बसवला जातो. मुस्लीम बांधव मनोभावी गणेशाची पूजा-अर्चा करतात. 1980 सालापासून या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणतात. 44 वर्षांपासून मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली जात आहे. 

नक्की वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात?

काय आहे इतिहास?
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे पंधरा हजार लोक वस्तीचं गाव आहे. या गावात सर्व जाती धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिदुंचे सण मुस्लीम साजरे करतात, तर मुस्लिमांच्या सनात  हिंदू  खुशीने सहभागी होतात. या  गावात गेल्या 43 वर्षांपासून मशिदीत गणपती बसवला जातो. न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मुस्लीम बांधव मनोभावी गणेशाची पूजा-अर्चा  करतात. नऊ दिवस गोटखिंडीत हा सोहळा असतो. गणेशाच्या आरती वेळेस गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतात. यंदाचं हे 44 वे वर्ष असून इस्लामपूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Advertisement

नक्की वाचा - Khuni Ganpati : मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन; काय आहे धुळ्यातील 'खुनी गणपती'चा इतिहास?

1961 साली पुण्याचे पानशेत धरण फुटले होते. त्यादरम्यान पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू होता आणि याचवेळी या गणेश मंडळाच्या स्टेजमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने इथल्या स्थानिक लोकांनी मुस्लीम बांधवांचा पुढाकार घेऊन गणपतीची मूर्ती मशिदीमध्ये बसवण्यास सुरुवात केली. त्यावेळी या मंडळाचे पहिले अध्यक्ष मुस्लीम समाजाचे इलाही पठाण होते. त्यानंतर काही वर्ष खंड पडल्यानंतर पुन्हा 1980 साली या प्रथेला सुरुवात झाली.  

गोटखिंडीत हिंदू - मुस्लीम नागरिक एकत्र येऊन गणपती बाप्पाला कुठे बसवायचं असा प्रश्न पडला होता. यावेळी मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती ठेऊ असा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 44 वर्षांपासून मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली जात आहे. गोटखिंडी गावात गणपती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात असून वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात. त्या बरोबरच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, बेटीबचाव बेटी पढाओ अश्या दोन्ही समाजातील युवक खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रम राबवतात. या मंडळाचा आदर्श देशाने घ्यावा असे काम येथे गोटखिंडीमध्ये सुरू आहे. 

Advertisement