जाहिरात

दही-हळद लावल्याने चेहऱ्यावर येते चमक? जाणून घ्या ग्लोइंग त्वचेचे सत्य

Skin Care Tips: दही आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते. पण खरंच दही व हळदीच्या फेसपॅकमुळे त्वचेवर ग्लो येतो का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

दही-हळद लावल्याने चेहऱ्यावर येते चमक? जाणून घ्या ग्लोइंग त्वचेचे सत्य

Glowing Skin Home Remedies: बदलत्या लाइफस्टाइलनुसार हल्ली बहुतांश लोक आरोग्यासोबतच त्वचेची देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहेत. सौंदर्य उत्पादनांसह लोक घरगुती औषधोपचार करण्यावरही भर देताहेत. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी शतकानुशतके घरगुती उपचारांना महत्त्वाचे स्थान आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठी केला जाऊ शकतो. फार पूर्वीपासून केला जाणारा लोकप्रिय उपाय म्हणजे दही आणि हळदीचे मिश्रण, पण दह्यामध्ये हळद मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावर खरंच चमक येते का? जाणून घेऊन सविस्तर माहिती...  

(ट्रेडिंग न्यूज : नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण)

चेहऱ्यावर दही लावण्याचे फायदे (Benefits of Applying Curd On Face)

मॉइश्चराइझर : दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो, यामुळे त्वचा मऊ होते. 
मृत त्वचेची समस्या : त्वचेसाठी दही नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचे कार्य करते. 
अँटी - बॅक्टेरिअल गुणधर्म : दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स त्वचेचे जंतूंपासून संरक्षण करतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.  

चेहऱ्यावर हळद लावण्याचे फायदे (Benefits Of Applying Turmeric On The Face)

अँटी इंफ्लेमेटरी : हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक असते तसेच यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मही आहेत, ज्यामुळे त्वचेवरील सूज आणि लालसरपण कमी होण्यास मदत मिळते.  
अँटी ऑक्सिडेंट्स : हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्मही आहेत, ज्यामुळे त्वचेचे फ्री- रेडिकल्सपासून संरक्षण करते आणि यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. 
त्वचा होते चमकदार : हळदीचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.  

(ट्रेडिंग न्यूज : Skin Care: चेहऱ्यावर कसे व किती वेळा लावावे सीरम? या चुका करणे टाळा)

दही आणि हळदीचे मिश्रण कसे तयार करावे? (How To Make Curd And Turmeric Face Pack)

  • एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दही घ्या. 
  • यानंतर अर्धा चमचा हळद मिक्स करा. 
  • दोन्ही सामग्रींचे व्यवस्थितपणे मिश्रण तयार करावे.   

(ट्रेडिंग न्यूज : तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)

चेहऱ्यावर कसे लावावे मिश्रण?

  • चेहऱ्यासह संपूर्ण मानेवर लेप लावावा.
  • 15 ते 20 मिनिटांनंतर लेप राहू द्यावा
  • यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि हलक्या हाताने त्वचा टॅप-टॅप करावी.

दही आणि हळदीचे हे मिश्रण नियमित स्वरुपात लावल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. चेहऱ्याची त्वचा निरोगीही राहते. यासह मुरुम, काळे डाग, टॅनिंग यासारख्या समस्याही दूर होतील.  

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com