Gudi Padwa 2026 Date And Shubh Muhurat: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले. तसेच शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून नवे युग सुरू केले. हा दिवस केवळ विजयाचे प्रतीक नसून चैतन्य आणि मांगल्याचा उत्सव आहे. घरोघरी उभारली जाणारी गुढी (Gudi Padwa 2026) समृद्धीचे दर्शन घडवते. नव्या संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित होते. गुढीपाडवा (Gudi Padwa 2026 News) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस शुभ म्हणून नवीन कामाचा, कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो.
गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व? गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे? | Gudi Padwa 2026
- श्रीराम 14 वर्षे वनवास भोगून, रावणाचा वध करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले, तो हाच वर्षप्रतिपदेचा दिवस होता.
- ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तो चैत्र होता. म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढी उभारून केली जाते, असे म्हणतात.
- शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले होते, त्यात प्राण निर्माण करुन फौज तयार केली आणि शकाचा पराभव केला, या पराक्रमाची आठवण म्हणून शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला, असेही म्हणतात.
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त | Gudi Padwa 2026 Shubh Muhurat
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो. सूर्योदयानंतर ते सुमारे सकाळी 10:30 वाजेपर्यंत गुढी उभारावी.
(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2026 Wishes: ध्येयाची गुढी उंच उभारूया, प्रगतीच्या शिखराकडे झेप घेऊया; गुढीपाडव्याच्या शुभेच्छा)
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त | Gudi Padwa 2026 Tithi Timingsचैत्र प्रतिपदा तिथी आरंभ 19 मार्च सकाळी 6.52 वाजता
चैत्र प्रतिपदा तिथी समाप्त 20 मार्च पहाटे 4.52 वाजता
(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2026 Wishes: यशाची गुढी आणि समृद्धीची पहाट, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या 25+ शुभेच्छा)
गुढीपाडवा 2026 पूजा विधी | Gudi Padwa 2026 Puja Vidhi- पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करा
- घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा
- घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावा
- देवघर स्वच्छ करून दिवा प्रज्वलित करावा
गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य | Gudi Padwa 2026 Puja Samagri
- बांबूची काठी
- स्वच्छ रेशीम/नवीन कापड (विशेषतः पिवळे, केशरी, हिरवे रंगाचे)
- साखर गाठी
- कडुलिंबाची पाने
- आंब्याची पाने
- फुलांचा हार
- तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (पालथा ठेवण्यासाठी)
- हळद-कुंकू, अक्षता
- अगरबत्ती, दिवा, नैवेद्य
(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याच्या प्रसादात आरोग्याचा खजिना, डॉ. मानसी धामणकरांनी सांगितले 7 फायदे)
गुढी कशी उभारावी | Gudi Padwa 2026
- बांबूची काठी स्वच्छ करून त्यावर वस्त्र बांधावे.
- फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंब-आंब्याची पानांनी गुढी सजवावी.
- तांब्या/लोटा पालथा ठेवावा.
- घराच्या उजव्या बाजूला खिडकीत किंवा गॅलरीमध्ये उंच ठिकाणी गुढी उभारावी.
- गुढीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य अर्पण करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world