जाहिरात

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला गुढी कशी सजवावी? कशी उभारावी? कशी उतरवावी? जाणून घ्या योग्य पद्धत

Gudi Padwa 2026: गुढी कशी उभारावी? गुढी उभारण्याची योग्य पद्धत, आवश्यक साहित्य, पूजा विधी आणि कडुनिंबाच्या प्रसादाचे महत्त्व या लेखाद्वारे सविस्तर जाणून घेऊया...

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला गुढी कशी सजवावी? कशी उभारावी? कशी उतरवावी? जाणून घ्या योग्य पद्धत
"Gudi Padwa 2026: गुढी कशी उभारावी?"
Sonalee Kulkarni Instagram
  • चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हा सण महाराष्ट्रात ऋतूचक्रातील बदल व जीवनातील कडू-गोड अनुभवांचे प्रतीक
  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
  • गुढी उभारताना ती घराच्या बाहेरील बाजूस किंचित झुकलेली आणि जमिनीला न स्पर्श करणाऱ्या उंच जागी ठेवावी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Gudi Padwa 2026: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारली जाते. कडुनिंबाची पाने, साखरेची गाठी आणि रेशमी वस्त्र यांनी सजलेली ही गुढी मांगल्याचे प्रतीक मानली जाते. हा सण केवळ ऋतूचक्रातील बदलाचे स्वागत करत नाही, तर मानवी जीवनात कडू-गोड अनुभवांचे महत्त्वही अधोरेखित करतो. गुढी कशी उभारावी, धार्मिक महत्त्व, गुढी कशी उतरावी, प्रसाद यासह अन्य महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...

गुढी उभारण्यापूर्वी पहाटे उठून अभ्यंगस्नान करावे. यानंतर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी. 

गुढी कशी तयार करावी? | Gudi Kashi Ubharavi?

  1. काठी: एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी.
  2. वस्त्र: काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र बांधावे. 
  3. साखर गाठी आणि कडुलिंब: वस्त्रासह साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधाव्या.
  4. फुलांची माळ: झेंडूच्या फुलांची माळ गुढीला अर्पण करावी.
  5. तांब्या (कलश): सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या (कलश) पालथा ठेवावा. या तांब्यावर कुंकूच्या मदतीने स्वस्तिक काढावे.

गुढी उभारण्याची पद्धत | Gudi Installation 

सजवलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही, अशा हिशेबाने एका उंच ठिकाणी किंचित झुकलेली गुढी उभारावी, गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरील बाजूस असावे.

(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: महागाई, राजकीय तणावाची शक्यता? कोणाचे नशीब बदलणार? गुरुजींनी 12 राशीचे सांगितले भविष्य व उपाय)

गुढीची पूजा कशी करावी? | Gudi Padwa 2026 Puja 

गुढीला हळद-कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. गुढीला गुळ-खोबरे किंवा श्रीखंड-पुरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रार्थना करावी. 

गुढी उभारताना या चुका करणं टाळा, पाहा व्हिडीओ

(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2026 Wishes: यशाची गुढी आणि समृद्धीची पहाट, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या 25+ शुभेच्छा)

गुढीपाडव्याचा खास प्रसाद

कडुलिंबाची पाने, जीरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून प्रसाद तयार करावा. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा.  

(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याच्या प्रसादात आरोग्याचा खजिना, डॉ. मानसी धामणकरांनी सांगितले 7 फायदे)

गुढीला साडी कशी नेसवावी? पाहा व्हिडीओ

गुढी उतरवण्याची वेळ
  • सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद-कुंकू अर्पण करावे आणि  प्रार्थना करून गुढी सन्मानाने खाली उतरवावी. 
  • गुढीवरची साखर (गाठी) सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com