Natural Shampoo For Hair Fall: केमिकलवाला शॅम्पू सोडा, केसांसाठी हे फळ वापरा! कोंडा, केसगळती होईल पटकन कमी

Natural Shampoo For Hair Fall: केसांसाठी केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी एक रामबाण आयुर्वेदिक उपाय करून पाहा. केसगळती, कोंडा, केस तुटणे यासारख्या समस्या झटकन होतील दूर..

जाहिरात
Read Time: 2 mins
"Hair Care Tips: केसगळती, कोंड्यावर रामबाण उपाय"

Natural Shampoo For Hair Fall: आयुर्वेदामध्ये शतकानुशतके केस आणि त्वचेच्या देखभालीसाठी रिठ्याचा वापर केला जात आहे. रिठ्याचे झाड आकाराने मोठे असते, जे विशेषतः हिमालय आणि बिहारच्या काही भागांमध्ये आढळते. रिठ्यामध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार करणाऱ्या घटकाचा (सॅपोनिन) समावेश असतो, ज्यामुळे रिठा केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक क्लीन्झर मानले जाते. 

केसांसाठी रिठ्याचा वापर ठरेल फायदेशीर

आजच्या काळात जेव्हा बाजारात प्रत्येक गोष्टीत केमिकलचा वापर केला जातो, अशा वेळेस केसांसाठी रिठा हा एक असा नैसर्गिक पर्याय आहे, ज्याद्वारे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केसांची स्वच्छता आणि निगा राखण्यास मदत मिळते. पूर्वीच्या काळी लोक शॅम्पूऐवजी रिठ्याचाच वापर करत असत. रिठा पाण्यात भिजवून किंवा उकळून त्या पाण्याने केस धुतले जात, ज्यामुळे केस स्वच्छ, मऊ आणि चमकदार होत असत.

Advertisement

केसांसाठी रिठ्याचे फायदे

रिठ्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातील घटक केसांना मुळांपासून स्वच्छ करतात आणि केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात. रिठ्यातील तत्त्व स्कॅल्प (डोक्याची त्वचा) निरोगी ठेवतात आणि कोंड्यासारख्या समस्यांपासून सुटकाही होते. जे लोक टाळूच्या त्वचेवरील खाज किंवा जळजळ होण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी रिठ्याचा वापर फायदेशीर मानला जातो

(नक्की वाचा : Summer Tips For Animals: उन्हाळ्याचा जनावरांच्या आरोग्यालाही फटका! विषबाधेची कारण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)

याव्यतिरिक्त रिठ्यामुळे केस मुळासकट मजबूत होण्यात मदत मिळते. नियमित योग्य पद्धतीने वापर केल्यास केस गळतीची समस्या कमी होऊ शकते आणि केसांची वाढ देखील चांगली होते. शिवाय केसांवर नैसर्गिक चमकही येईल.

Photo Credit: NDTV Marathi

रिठ्याचा केसांसाठी कसा करावा वापर?

रिठ्याचा वापर करणे अतिशय सोपे आहे. रिठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा किंवा पाण्यामध्ये उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून शॅम्पूसारखे वापरा. 
काही लोक रिठा आवळा आणि शिकाकाईसोबत मिक्स करून देखील वापरतात, ज्यामुळे केसांना अधिक फायदे मिळतात. 

रिठा केवळ केसांसाठीच नाही, तर कपडे आणि घराच्या स्वच्छतेसाठी देखील वापरला जातो. रिठा सर्व वयोगटासाठी फायदेशीर मानले जाते. 

(नक्की वाचा : Footwear Vastu Tips: बुट-चपलांचा शनी ग्रहाशी काय संबंध काय? कसे बिघडते तुमचे भाग्य? या 9 गोष्टी टाळू नका)

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )