Hair Loss Remedies: केसगळतीमुळे हैराण? 1 चमचा तुपात हळद मिक्स करून लावल्यास काय होईल? जाणून घ्या 4 रामबाण उपाय

Hair Loss Tips: केसळगती कमी करण्यासाठी डॉक्टर रुचा पै यांनी सांगितलेले प्रभावी उपाय जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Hair Loss Tips : केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक उपाय"
Pooja Birari Instagram

- डॉक्टर रुचा पै

Hair Loss Tips: केसगळतीच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रासलेले असतात. कित्येकदा महागडे सीरम, शॅम्पू वापरल्यानंतर केसांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत नाही. पण ही केवळ बाहेरील समस्या नाही, यासाठी शरीराच्या आतील दोषांवरही उपाय करणं आवश्यक आहे. आयुर्वेदिक डॉक्टर रुचा पै यांनी सोशल मीडियावर केसगळती होण्यामागील कारणं आणि त्यावरील उपाय सांगितले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

आयुर्वेदिक डॉक्टर रुचा पै यांच्या माहितीनुसार, केसगळतीचं खरं कारण बाहेरील गोष्टींवरुन अवलंबून नसतं. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य चार गोष्टींवर अवलंबून असतं, पुढीलप्रमाणे...

  • शरीरातील पित्त दोष वाढला की स्कॅल्पचा भाग उष्ण होतो आणि केसांचे मूळ कमकुवत होतात.
  • शरीरातील वात दोष वाढला की केसांमधील ओलावा कमी होऊन केस कोरडे होतात.
  • रक्त शुद्ध नसले की कोंडा आणि स्कॅल्पच्या भागातील खाज आणि सूज वाढते.
  • अस्थी धातू-हाडं, नखं आणि केस याचाच धातू; तो कमकुवत असेल तर केसाची पकडही कमी होते.

यात भर म्हणून अग्नी मंद असेल तर पोषणतत्त्व केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी केस पातळ आणि कमकुवत होतात. केसांची वाढही खुंटते. म्हणूनच केसांचे गळणे पित्त दोष, वात दोष, रक्त, अस्थी आणि पचन बिघडल्याचे संकेत आहेत. 

केसगळती रोखण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

स्कॅल्पच्या भागातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय

  • एक चमचा तूप + चिमूटभर हळद एकत्रित करा.
  • हे मिश्रण रात्री केवळ केसांच्या मुळांवर लावा.
  • या मिश्रणामुळे स्कॅल्पचा भाग शांत होईल, उष्णता आणि लालसरपणाही कमी होईल.

काकडीचा रस

  • काकडीचा रस तयार करून 10 मिनिटे स्कॅल्पवर लावा.
  • यामुळेही स्कॅल्पवरील उष्णता, जळजळ आणि खाज कमी होईल.

केसांचा कोरडेपणा आणि केसांचे तुटणे कमी करण्यासाठी उपाय 

  • नारळ तेल आणि कढीपत्ता
  • कढीपत्त्याची 10-12 पाने नारळ तेलात गरम करा आणि तेल थंड करा. 
  • हे तेल केसांवर लावल्यास केसांचे मूळ मजबूत होतील आणि केसांचे तुटणेही कमी होईल.

आठवड्यातून एकदा दही आणि मेथीचा लेप लावा. यामुळे केस मऊ होतील.

केसांमधील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी उपाय 

  • ग्लासभर पाण्यात मेथीच्या बिया भिजत ठेवा.
  • यानंतर पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा.  
  • सकाळी उठल्यानंतर हे पाणी स्प्रे करा.   

Advertisement

(नक्की वाचा: Health News: केसगळती, डोकेदुखी, नैराश्य, मूत्रमार्गातील संसर्गाचा सामना करताय? शरीरात होतेय या गोष्टीची कमतरता)

कोंडा कमी, स्कॅल्प स्वच्छ होण्यासाठी उपाय
  • आवळा पावडर आणि गुलाबजल एकत्रित करुन केसांना आणि स्कॅल्पला लावा.
  • स्कॅल्पचा दाह कमी होईल आणि स्कॅल्पची त्वचा शुद्ध होईल. 

(नक्की वाचा: Fastest Hair Growth Oil: केसांच्या भराभर वाढीसाठी कोणते तेल सर्वात प्रभावी ठरेल? केसांना तेल कसं लावावं? वाचा माहिती)

पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी उपाय
  • कोमट पाणी प्यावे.
  • जेवण नीट चावून खावे.
  • तिखट-आंबट-उष्ण पदार्थांचं कमी प्रमाणात सेवन करावे.
  • रात्रीच्या वेळेस दही खाणे टाळा. 
Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)