Dhanteras 2024 Wishes: लक्ष्मीदेवी तुमच्या कुटुंबीयांवर करो सुखाचा वर्षाव... धनत्रयोदशीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास शुभेच्छा

Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
Happy Dhanteras 2024: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras Wishes 2024: धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मीमाता आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी, दागिने, भांडी, जमिनी इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी केली जाते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. 

धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त 2024 - Dhanteras Puja Muhurta 2024

धनत्रयोदशी तिथीचा शुभारंभ 29 ऑक्टोबर 2024 सकाळी 10.32 वाजता सुरू होणार असून 30 ऑक्टोबर 2024ला दुपारी 01.16 वाजता तिथी समाप्त होईल. 

या खास दिवशी तुमच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांनाही धनत्रयोदशीच्या खास शुभेच्छा नक्की पाठवा...

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dhanteras Wishes 2024)

धनत्रयोदशीला तुमच्या जीवनात सुखाचा वर्षाव होवो 
तुमच्या घरामध्ये कायम नांदो सुख-समृद्धी 
तुमच्या जीवनात रोज नव्या रंगांची होवो उधळण  
आणि मिठाईप्रमाणे तुमच्या नात्यात येवो गोडवा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

दीपप्रज्वलनाने प्रकाशमान होवो तुमचे जीवन
तुमच्या सर्व इच्छा होवोत पूर्ण 
देवी लक्ष्मीमातेची तुमच्यावर कायम राहो कृपा 
धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरचा मिळो मोठा आशीर्वाद 
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

Advertisement

(नक्की वाचा: Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोनं खरेदी का करतात? वाचा दिवाळीपूर्वीचा मुहूर्त)

धनत्रयोदशीचा शुभ दिवस आला 
सर्वांसाठी आनंद घेऊन आला
लक्ष्मीमाता, श्रीगणेशाचा तुमच्या घरात असो निवास
कुटुंबीयांवर होवो आनंदाचा वर्षाव  
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

तुमच्या घरावर होवो धनाचा वर्षाव
घरामध्ये नांदो शांतता कायम
संकटांचा होवो नाश 
लक्ष्मीचा राहो कायम आशीर्वाद
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

Advertisement

(नक्की वाचा: Diwali Decoration Ideas: केळीच्या पानापासून घरच्या घरी झटपट तयार करा तोरण)

दिव्याचा प्रकाश
मिठाईचा गोडवा
फटाक्यांची आतशबाजी
सुख-समृद्धीचा वर्षाव
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी घेऊन येवो आनंद
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

सोने-चांदीप्रमाणे चमकत राहो तुमची नाती 
धनत्रयोदशीच्या दिवशी सुखांचा होवो वर्षाव 
प्रत्येक दिवशी होवो प्रेमाची उधळण
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

धनत्रयोदशीची पहाट घेऊन येवो नवा प्रकाश 
तुमच्या आयुष्यात येवो मोठा आनंद  
तुमच्या चेहऱ्यावर सदैव राहो हसू 
याच आमच्या शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

Advertisement

(नक्की वाचा: Car Offers : दिवाळीत कार खरेदीची सुवर्णसंधी; 'या' कंपन्यांच्या कारवर लाखोंची सूट)

तुमचे स्वप्न घेवो नवी भरारी 
प्रत्येक इच्छा होवो पूर्ण 
यंदाच्या धनत्रयोदशीला आनंद आणि समृद्धी वाढो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024
 
मनामध्ये आनंद आणि अंत:करणामध्ये समाधान असू दे
धनत्रयोदशीला धन-वैभवाचा होवो वर्षाव
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dhanteras 2024

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)