जाहिरात

Dussehra 2024: दसरा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि योग्य तारीख

Dussehra Date And Time: वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणजे दसरा सण. यंदा दसरा सण कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त आणि शस्त्र पूजन कधी करावे? जाणून घ्या माहिती....

Dussehra 2024: दसरा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि योग्य तारीख

Dussehra Date And Time: नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे. दशमीच्या दिवशीच प्रभू श्री राम यांनी रावणाचा वध केला होता. तेव्हापासून दसरा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. दरवर्षी दसरा सणाला रावणाचा महाकाय पुतळा तयार करून त्याचे दहन केले जाते. यंदा दसरा पूजन, रावण दहन आणि शस्त्र पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घेऊया...

दसरा शुभ मुहूर्त  Dussehra 2024 Shubh Muhurat

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला 12 ऑक्टोबरला सकाळी 10.58 वाजता सुरू होणार असून समाप्ती 13 ऑक्टोबरला सकाळी 9.08 वाजता होणार आहे. उदया तिथीनुसार दशमी 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. 

Dussehra Wishes: वाईटावर चांगल्याचा विजय! नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही पाठवा दसऱ्याच्या खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Dussehra Wishes: वाईटावर चांगल्याचा विजय! नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही पाठवा दसऱ्याच्या खास शुभेच्छा)

दसरा सणाला जुळून आले आहेत मोठ योग 

पंचांगानुसार दसरा सणाच्या दिवशी बरेच शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी, रवी योगसह श्रवण योग जुळून आले आहेत. श्रवण नक्षत्रामध्ये दसऱ्याचा सण साजरा केल्यास शुभ फळ प्राप्ती होते, असे मानतात. पंचांगानुसार श्रवण नक्षत्र 12 ऑक्टोबरला पहाटे 5:24 वाजता सुरू होईल, जे दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 वाजेपर्यंत असेल. यासोबतच 13 ऑक्टोबरला पहाटे 5:25 वाजेपासून ते 4:27 वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर याच दिवशी सकाळी 06:20 वाजेपासून ते 06:21 वाजेपर्यंत रवि योग आहे.

Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 

(नक्की वाचा: Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त)

शस्त्र पूजन मुहूर्त  Dussehra 2024 Shastra Pujan Muhurat

दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा (Shastra Puja) विजय मुहूर्तावर करणं शुभ मानले जाते. यंदा दसऱ्याच्या पूजनाचा शुभ मुहूर्त दुपारी 2.02 ते 2.48 वाजेपर्यंत आहे.

Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Kolhapur Ambabai Mahalaxmi| कोल्हापूरच्या अंबाबाईचा आज अष्टमीचा जागर सोहळा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com