Happy Navratri 2025 Wishes And Quotes In Marathi: नवरात्रौत्सव म्हणजे दुर्गामातेच्या नऊ रूपांची उपासना करण्याचा उत्सव. शारदीय नवरात्रीस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या शैलपुत्री माता, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा माता, स्कंदमाता माता, कात्यायनी माता, कालरात्री माता, महागौरी माता आणि सिद्धिदात्री माता या रुपांची पूजा केली जाते. नऊ दिवस उपवास, गरबा-दांडिया, कीर्तन अशा विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्री म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सकारात्मकता, श्रद्धा आणि निष्ठेने जीवन जगण्याचा संकल्प करावा. नवरात्रीच्या खास शुभेच्छाही प्रियजनांना पाठवून सण साजरा करा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा | Happy Navratri 2025 Wishes And Quotes In Marathi
1. नवरात्रीचे आले दिव्य दिवस
देवीच्या कृपेने फुलो तुमचे नशीब
शक्ती, भक्ती, समृद्धीचा प्रकाश
मिळो तुम्हाला यशाची सुवर्ण वाट
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
2. आई दुर्गेच्या भक्तीमुळे
जीवनात प्रेम, विश्वास, आणि आनंद लाभो
नवचैतन्य घेऊन येवो प्रत्येक पहाट
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
3. नवरात्रीच्या नऊ दिवसांत
देवीचा आशीर्वाद प्रत्येक क्षणी लाभो
आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो
तुमचे जीवन सदा मंगलमय राहो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Navratri 2025!
4. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत
देवीआईचा जयघोष घुमो घराघरात
सुख-समृद्धीचा वर्षाव होवो प्रत्येकावर
नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5. आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊया
तिच्या कृपेने संकटांवर मात करू
नवदुर्गेचा जयजयकार करू
भक्ती आणि आनंदात नवरात्री साजरी करू
शुभ नवरात्री!
(नक्की वाचा: Happy Navratri 2025 Wishes In Marathi: देवीच्या शक्तीची उपासना आणि भक्तीचा सागर, नवरात्रीच्या पाठवा भक्तिमय शुभेच्छा)
6. नवदुर्गेचे रूप, तेज आणि शक्ती
प्रत्येक घरात नांदो भक्ती
सुख, समाधान, समृद्धीची साथ
देवीचे असो तुमच्यावर आशीर्वाद
शुभ नवरात्री 2025!
7. घटस्थापनेच्या मंगल क्षणी
देवीमातेचे रूप आठवते मनी
तिचा आशीर्वाद घेऊन चालू नवीन वाट
अडथळ्यांवर करुन मात
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
8. आई अंबेचा जयजयकार करा
शुभ संकल्पांमुळे जीवन आनंदाने जावो व्यापून
शक्ती, सद्भाव आणि भक्तीची साथ
देवीचं नाव घेऊन रंगून जाऊ भक्तीच्या रंगात
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Navratri 2025!
9. आई दुर्गेच्या भक्तीचा सागर
कृपादृष्टी राहो अपार
प्रत्येक घरात असो सणाचा गजर
मनात सदा राहो भक्तीचा जागर
शुभ नवरात्री 2025!
Shubh Navratri 2025!
10. नऊ दिवस, नऊ रूपांची आराधना
मनात साठवू भक्तीची भावना
नवरात्रीचे हे नवे पर्व
तुमचे जीवन असो सदा हर्षमय
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Photo Credit: Canva AI
11. दिशा हरवलेल्या वाटांना दिशा मिळो
आईच्या कृपेने नवजीवन फुलो
संकटं आणि चिंता होवो दूर
नवरात्रीत तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण
12. नवरात्रीच्या रंगांनी रंगू दे आयुष्य
प्रत्येक रंगात साठवू नवीन संकल्पयश
शक्तीचा स्रोत म्हणजे दुर्गामातेचं नाव
तिच्या आशीर्वादाने जीवन होवो आनंदमय
Shubh Navratri 2025!
13. नवरात्रीचे स्वागत करू उत्साहात
देवीचं स्मरण करू श्रद्धेच्या भावात
संपत्ती, आरोग्य आणि यश मिळो
आईच्या कृपेने जीवन उजळो
नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)
14. नऊ दिवस, नऊ आरती
देवीच्या भक्तीने व्यापून जावे आयुष्य
प्रत्येक पावलावर तिचा आशीर्वाद राहो
जीवनात केवळ सुखच नांदो!
शुभ नवरात्री!
15. प्रत्येक दिवशी देवीचं नाव घ्या
सर्वांवर प्रेम आणि दया दाखवा
आईच्या आशीर्वादाने जीवन फुलो
सुख-समृद्धीने घर उजळो!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)