
Happy Navratri 2025 Wishes In Marathi: शारदीय नवरात्रौत्सवास 22 सप्टेंबरपासून शुभारंभ होतोय. पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ स्वरुपांची मनोभावे उपासना केली जाईल. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आता सर्वत्र केवळ चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असणार आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना भक्तिमय शुभेच्छा नक्की पाठवा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Navratri 2025 Wishes In Marathi | Shardiya Navratri 2025 Wishes
1. नऊ दिवस
देवीच्या शक्तीची उपासना
भक्तीचा सागर आणि
आनंदाचा महोत्सव घेऊन येतात
यंदाच्या नवरात्रीत तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जावो
शुभ नवरात्री!
2. आई दुर्गेची कृपा तुमच्यावर राहो सदैव
तिच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आरोग्यदायी, यशस्वी आणि आनंदी होवो
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

Photo Credit: Canva
3. देवी दुर्गा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो
आणि आशेचा नवा किरण दाखवो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
4. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना
यंदाचा नवरात्रोत्सव तुमचे जीवन मंगलमय करो
प्रत्येक दिवस सुख, शांती आणि उर्जेने परिपूर्ण असो
शुभ नवरात्री 2025!
5. नवरात्री म्हणजे नवचैतन्याचा उत्सव
नऊ दिवस, नऊ रूपं, नऊ रंग आणि नऊ संकल्प
देवीच्या प्रत्येक स्वरुपातून प्रेरणा घेऊन जीवनात करू नवीन सुरुवात
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
6. तुमचं जीवन देवीआईच्या आशीर्वादाने फुलावं आणि मनःशांती लाभो
तुमचे सर्व संकल्प पूर्ण होवो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर)
7. यंदाची नवरात्री तुमच्यासाठी यशाची नवी संधी येवो
देवीची कृपा सदैव तुमच्यावर असो
प्रत्येक दिवस नवा उत्साह घेऊन येवो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. नवरात्री म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा संगम
ही नवरात्र तुमच्यासाठी सर्वार्थाने समृद्धी घेऊन येवो
या उत्सवात देवीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि नवा अध्याय सुरू करा
नवरात्रीच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)
9. प्रत्येक रंग हे जीवनाचं रूप आहे
आणि नवरात्री हा नवरंगांचा उत्सव आहे
सुंदर आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा!
नवरात्रीच्या शुभेच्छा!
10. नवरात्र म्हणजे मनोबल, आत्मविश्वास आणि प्रेरणाचा मोठा उत्सव
देवीआईची कृपा सदैव तुमच्यावर असो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
तुमचं जीवनही शुभ होवो
हीच आई अंबेचरणी प्रार्थना
शुभ नवरात्री!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world