
Aishwarya Rai Bachchan Rakhi Brother: भाऊबहिणीच्या नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2025). हा सण केवळ रक्ताची नातीच नव्हे तर मनापासून एकमेकांना भाऊबहीण मानणारे देखील रक्षाबंधन उत्साहात साजरी करतात. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील सख्ख्या भावाव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीसोबत हा सण साजरा करतेय. बॉलिवूडमधील या अभिनेत्याला मागील 17 वर्षांपासून ऐश्वर्या राखी बांधतेय.
ऐश्वर्या रायचा हा भाऊ कोण आहे?
2008मध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या "जोधा-अकबर" सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या आणि सोनू सूद यांच्यामध्ये भाऊबहिणीचे निर्माण झालेले नाते आजही टिकून आहे. या सिनेमामध्ये ऐश्वर्या रायने जोधाबाईची आणि सोनू सूदने तिचा भाऊ कुंवर सुजामलची भूमिका निभावली होती. जो आपल्या बहिणीसाठी आपले राज्य पणाला लावण्यास तयार होता. पडद्यावरील भाऊबहिणीची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही एका सुंदर नात्यामध्ये बदलली.
(नक्की वाचा: Aishwarya-Abhishek : ऐश्वर्याशी घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेकनं सोडलं मौन! गप्प बसण्याचं सांगितलं कारण)

राखी बांधण्याचे नाते कथित स्वरुपात "जोधा अकबर" सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सुरू झाले होते. जेव्हा ऐश्वर्याने सेटवर सोनूला राखी बांधली तेव्हापासून प्रत्येक रक्षाबंधनाच्या सणाला सोनू ऐश्वर्याकडून राखी बांधून घेतो. "द टाइम्स ऑफ इंडिया" या वृत्तसंस्थेला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सोनूने 'जोधा अकबर' सिनेमाच्या सेटवरील एक आठवण शेअर करताना सांगितले होते की एका सीनदरम्यान ऐश्वर्याने मला म्हटलं होतं की तुमच्यामुळे मला अमिताभ बच्चन यांची आठवण येते. तसेच ऐश्वर्या राय सोनूला प्रेमाने "भाई साहब" या नावाने हाक मारते.
(नक्की वाचा: Aishwarya Rai News: ऐश्वर्या रायचे कधीही न पाहिलेले 10 फोटो, सर्वांमध्ये दिसतेय आईचीच छबी)
सोनू सूदचे बच्चन कुटुंबीयांसोबतचे नाते केवळ ऐश्वर्यापर्यंत मर्यादित नाहीय. तर सोनूने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'साथ बुड्ढा... होगा तेरा बाप' आणि अभिषेक बच्चनसोबत 'युवा' आणि हॅपी न्यू इअर या सिनेमांमध्ये काम केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world