77th Republic Day 2026 Wishes: 26 जानेवारी म्हणजे आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपल्याला संविधान, लोकशाही आणि एकतेच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रपरिवार, कुटुंबीय, नातेवाईकांसह प्रियजनांना खास देशभक्तीचे शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा| Happy Republic Day 2026 Wishes| 77th Republic Day 2026 Wishes
1. संविधानाने दिले अधिकार आणि कर्तव्य
जगूया आपण जीवनात नीतीनिष्ठा बाळगून
लोकशाहीचा होवो विजय कायम
प्रजासत्ताक दिन साजरा करू उत्साहात
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
2. तिरंगा फडकतो गगनात ऊंच
देशभक्ती जपुया मनात
आनंदाने साजरा करू गौरवशाली दिन
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3. आपल्या देशाचा अभिमान
आपल्या देशाचे वैभव
आपण आपल्या देशाचे आहोत सुपुत्र
तीन रंगांनी सजला तिरंगा
हीच आहे आपली ओळख
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
4. भारतीय संस्कृती गौरवशाली
लोकशाहीचा विजय महान
देशभक्तीची जाणीव ठेवा
प्रजासत्ताक दिन घराघरात करूया साजरा
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
5. स्वातंत्र्याचा अमूल्य ठेवा
कर्तव्याची जाणीव राहो कायम
प्रजासत्ताक दिन साजरा करू उत्साहात
Happy Republic Day 2026

Photo Credit: Canva
6. तिरंगा फडकतो देशाच्या आकाशी
भारतीयांच्या हृदयात देशभक्ती
प्रजासत्ताक दिन साजरा करूया आनंदाने
सर्वत्र नांदो प्रेम आणि शांती
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
7. संविधानामुळे मिळाले अधिकार
कर्तव्य जपल्यास होईल विकास
देशभक्तीची जाणीव ठेवा हृदयात
प्रजासत्ताक दिन साजरा करूया जल्लोषात
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
8. एकतेत सामर्थ्य आहे आपल्या
भिन्नतेतही बंधुत्व जपण्याचा हा दिवस
तिरंगा फडकतो मानाने
प्रजासत्ताक दिन साजरा करूया प्रेमाने
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
9. स्वातंत्र्याच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांचे करू आभार व्यक्त
बलिदान देणाऱ्यांना करू सलाम
लोकशाही जिंदाबाद
प्रजासत्ताक दिन साजरा करूया धुमधडाक्यात
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
10. संविधानाने दिले मार्गदर्शन
कर्तव्य निभवू जीवनात निष्ठेने
प्रगतीसाठी एकत्र येऊ चला सर्व
प्रजासत्ताक दिन साजरा करूया जल्लोषात
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Happy Republic Day 2026 Wishes Quotes: भारताची खरी ओळख विविधतेत एकता, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!)
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Happy Republic Day 2026 Best Wishes Quotes
11. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका मोलाची
प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण आपले कर्तव्य पार पाडूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
12. आपल्या तिरंग्याला सलाम
त्यातील प्रत्येक रंग आपल्याला देतो प्रेरणा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
13. देशासाठी दिलेले प्रत्येक बलिदान स्मरणात ठेवूया
प्रजासत्ताक दिनी शूरवीरांना आदरांजली वाहुया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
14. आपल्या विविधतेत एकता हीच खरी ताकद आहे
प्रजासत्ताक दिन साजरा करताना
आपण हाच संदेश पसरवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
15. देशभक्ती आणि कर्तव्याची जाणीव
प्रत्येक भारतीयाला असावी
प्रजासत्ताक दिनी
या जाणीवेला उजाळा द्या
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
16. संविधानामुळेच आपल्याला
न्याय, समानता आणि स्वातंत्र्य मिळालंय
चला या दिवशी आपले हक्क आणि कर्तव्य दोन्ही आठवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
17. प्रजासत्ताक दिन हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही
तर आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
18. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आपण एकत्र येणे आवश्यक आहे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
19. भारताच्या गौरवशाली संस्कृतीला
आणि प्रजासत्ताक दिनाच्या आदर्शांना सलाम
चला आपण देशासाठी नेहमीच कटिबद्ध राहूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
20. चला त्यांना सलाम करूया
ज्यांच्यामुळे हे सुखाचे दिवस आपण पाहतोय
नशीबवान असते हे रक्त
जे देशाच्या उपयोगी येते
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
