Happy Valentine's Day 2025: प्रेमाचा संदेश पाठवून पार्टनरसोबत साजरा करा व्हॅलेंटाइन डे

Valentine's Day 2025: व्हॅलेंटाइन डेनिमित्त पार्टनरला खास मेसेज पाठवून सेलिब्रेट करा प्रेमाचा दिवस.

जाहिरात
Read Time: 3 mins

Happy Valentine's Day 2025: फेब्रुवारी या रोमँटिक महिन्याचा दुसरा आठवडा प्रेमी युगुलांसाठी अतिशय खास असतो. 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आजही कित्येक जण खास मेसेज, कविता किंवा शायरीचा आधार घेताना दिसतात. खास मेसेजद्वारे आवडत्या व्यक्तीकडे तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करा. तुम्ही पाठवलेला स्पेशल मेसेज पाहून त्याचा/तिचा संपूर्ण दिवस आनंदी जाईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा | Happy Valentine's Day Wishes 2025 In Marathi

1. मनातील भावना व्यक्त करण्याची आज आहे संधी
माझे प्रेमच आहे तुझ्यासाठी खास भेट 
स्वीकारशील याची आहे खात्री
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

2. तुझे हास्याने माझी प्रत्येक संध्याकाळ उजळावी 
प्रत्येक रात्र तुझ्या मिठीमध्ये शांततापूर्ण जावी 
तुझ्याशिवाय माझे हृदय आहे अपूर्ण  
तू कायम असावे माझ्याजवळ, बस इतकंच आहे माझे स्वप्न 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

3. माझ्या नावासोबत तुझे नाव छान वाटते
जणू एखाद्या सुंदर पहाटेसह 
जोडली जाते एक रम्य संध्याकाळ  
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

Advertisement

(नक्की वाचा: Valentines Day 2025: व्हॅलेंटाइन डेला पार्टनरला राशीनुसार द्या गिफ्ट, नाते होईल अधिक मजबूत)

4. तुझे गोडगोड बोलणे
तुझे सुंदर हसणे 
जर माझ्या जीवनी आले
तर माझे जगणे होईल सोपे
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

5. तुझ्या एका हास्यामुळे माझा दिवस चांगला जातो 
तुझ्या एका नजरेमुळे माझ्या हृदयाची धडधडत थांबते
तू माझ्या आयुष्यात यावे आणि जगणे बदलावे
तुझ्यासोबत मला संपूर्ण आयुष्य घालवायचंय 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

Advertisement

(नक्की वाचा: Valentine Week 2025: प्रेमाचा आठवडा झाला सुरू, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाइन वीकची पूर्ण लिस्ट)

6. तू आणि मी
परिपूर्ण नव्हतो
नंतर आपण एकरूप झालो
आणि आपोआपच झालो परिपूर्ण
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025
 
7. माझे हृदय तुझ्या प्रेमात हरवलंय
तुझे नाव घेताच माझ्या चेहऱ्यावर येते तेज 
तुझ्या प्रत्येक अदांवर माझे आहे प्रेम
तू जवळ असलास की प्रत्येक क्षण होतो सुगंधित 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

8. जेव्हा स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा आनंद अधिक महत्त्वाचा असतो, तेच खरे प्रेम असते.
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

Advertisement

9. असंख्य वेळा मी प्रेमात पडलोय 
यातील खास गोष्ट हीच आहे की 
नेहमीच तुझ्यावरच जीव जडलाय 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

10. तू कितीही दूर असलीस तरी हृदयाच्या जवळच असते
तुझ्यावरचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच जातंय
तूच आहेस माझा आनंद, तूच आहेस माझे जीवन 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

11. तिचे ते गोड हास्य
निरागस प्रेमळ डोळे
तिला पाहताच, ती लाजते
आणि माझ्या हृदयाची धडधड वाढते
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

12. व्हॅलेंटाईन डेची प्रेममयी सुरुवात  
आनंदाने व्यापलेले क्षण 
आपले प्रेमाचे मजबूत बंधन
तुझ्या-माझ्या संसाराची स्वप्नं
लवकरच होतील पूर्ण
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

13. माझी देवाला एकच आहे विनंती
तुझ्या प्रेमाशिवाय मला नकोय दुसरी कोणतीच भक्ती 
प्रत्येक जन्मात तूच व्हावेस माझा साथीदार 
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025

14.  लोक म्हणतात मी आहे परिपूर्ण 
पण एकटेपणा म्हणतो मी आहे अपूर्ण 
माझे मन तुझ्याशी जुळले तर   
तर अपूर्ण असूनही मी असेन परिपूर्ण
हॅपी व्हॅलेटाइन डे 2025| Happy Valentines Day 2025