जाहिरात

Valentine Week 2025: प्रेमाचा आठवडा झाला सुरू, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाइन वीकची पूर्ण लिस्ट  

Valentine Week 2025 List: व्हॅलेंटाइन वीक हा प्रेमी युगुलांसाठी अतिशय खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण लिस्ट...

Valentine Week 2025: प्रेमाचा आठवडा झाला सुरू, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाइन वीकची पूर्ण लिस्ट  

Valentine's Week 2025: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमी युगुल व्हॅलेंटाइन वीक साजरा करतात. व्हॅलेंटाइन डे (Valentine Day 2025) येण्यापूर्वी प्रेमाचे हे सात दिवसही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येकजण आपल्या पार्टनरसाठी काही-न्-काही सरप्राइज प्लॅन करतात. 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत कोणकोणते स्पेशल डे आहेत, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट (Valentine Week 2025 Full List) एका क्लिकवर... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्हॅलेंटाइन वीक 2025 | Valentine Week 2025 List  

तारीखवार डे स्पेशल
7 फेब्रुवारीशुक्रवाररोझ डे (Rose Day) 
8 फेब्रुवारीशनिवारप्रपोज डे (Propose Day)
9 फेब्रुवारीरविवारचॉकलेट डे (Chocolate Day)
10 फेब्रुवारीसोमवारटेडी डे (Teddy Day)
11 फेब्रुवारीमंगळवारप्रोमिस डे (Promise Day)
12 फेब्रुवारीबुधवारहग डे (Hug Day)
13 फेब्रुवारीगुरुवारकिस डे (Kiss Day)
14  फेब्रुवारीशुक्रवारव्हॅलेटाइन डे (Valentine's Day)

रोझ डे 
रोझ डेने व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होते. पार्टनरला किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन मनातील भावना व्यक्त करा.  

प्रपोज डे 
प्रपोज डेला प्रेमाच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करा. हटके पद्धतीने प्रपोज करण्यासाठी प्लॅन आखा.  

Rose Day 2025: कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय असतो अर्थ? जाणून घ्या माहिती

(नक्की वाचा: Rose Day 2025: कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय असतो अर्थ? जाणून घ्या माहिती)

चॉकलेट डे 
तुमच्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन नात्यातील गोडवा वाढवा. शक्य असल्यास स्वतः चॉकलेट तयार करून त्याला/तिला सरप्राइज द्या.  

टेडी डे 
टेडी हे देखील प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्या पार्टनरला टेडी डे दिवशी Teddy Bear नक्की भेट द्या. 

प्रोमिस डे 
प्रॉमिस डे म्हणजे प्रेमाचे वचन देण्याचा दिवस. या दिवशी जोडप्याने त्यांचे प्रेमाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी कायम एकत्र राहण्याचे आणि प्रामाणिकपणे साथ देण्याचे वचन द्यावे.

हग डे 
पार्टनरला दिलेले आलिंगन म्हणजे या कृतीद्वारे दिलेले शाश्वत प्रेमाचे वचन आणि सुरक्षिततेची भावना.   

किस डे 
व्हॅलेंटाइन वीकमधील सर्वात रोमँटिक दिवस म्हणजे किस डे. 

व्हॅलेंटाइन डे 
व्हॅलेंटाइन वीकचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्रेमीयुगुल वेगवेगळे प्लॅन करतात. या दिवसाच्या अविस्मरणीय आठवणींची साठवण करण्यासाठी प्रत्येक जोडप्याचे प्रयत्न असतात.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: