
Happy Haritalika Tritiya 2025 Wishes In Marathi: भारतीय संस्कृतीमध्ये हरितालिका तृतीया हा सण स्त्रीशक्ती, श्रद्धा, निष्ठा आणि सच्च्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी माता पार्वतीने अखंड आणि कठोर तपश्चर्या करून भगवान शिवशंकराला पती म्हणून प्राप्त केले होते. त्याच भक्तीने विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य तसेच निरोगी आरोग्यासाठी तर अविवाहित महिला मनासारखा पती मिळावा, यासाठी हे व्रत करतात. हरितालिका तृतीयेनिमित्त (Haritalika Tritiya 2025) तुम्ही देखील प्रियजनांना खास मेसेज पाठवून सणाच्या शुभेच्छा नक्की द्या.
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!| शुभ हरितालिका तृतीया 2025!| Happy Haritalika Tritiya 2025 Wishes In Marathi| Haritalika Teej 2025 Wishes In Marathi
1. शिवपार्वतीच्या प्रेमाचा सण
श्रद्धेचा आणि भक्तीचा ते व्रतधन
मातेसमोर हात जोडूया
जीवनात सुखशांती फुलवूया
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. पार्वती मातेचे हे व्रत पवित्र
तिच्या कृपेने होईल जीवन सुंदर
हरतालिकेच्या या शुभ दिवशी
प्रेम नांदो तुमच्या जीवनी
शुभ हरितालिका तृतीया 2025!
3. व्रत, भक्ती आणि मनाची शक्ती
हीच खरी नारीची संपत्ती
हरतालिकेच्या शुभक्षणी
सदैव लाभो सौख्य-वाणी
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
4. देवी पार्वतीचे हे व्रत महान
सामर्थ्याचे आणि प्रेमाचे प्रमाण
या दिवशी तिचा आशीर्वाद घ्यावा
देवतेच्या आशीर्वादाने सुख, शांती आणि प्रेम लाभो
शुभ हरितालिका तृतीया 2025!
5. उपवासाने शुद्ध होवो आत्मा
प्रेमाने फुलो तुमचे नाते
शिव-पार्वतीप्रमाणे अखंड साथ
मिळो तुम्हाला आयुष्यभर
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Hartalika Tritiya 2025 Wishes In Marathi: शिवपार्वतीसारखे पक्के नाते लाभो! हरितालिका तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा)
6. फुले वाहा देवीच्या चरणी
शुद्ध भाव ठेवा हृदयी
तिच्या कृपेने होईल कल्याण
आयुष्यात नांदेल मंगलप्रभात
शुभ हरितालिका तृतीया 2025!
7. प्रेम, निष्ठा आणि समर्पण
या गुणांचं हे व्रत एक दर्शन
हरतालिकेच्या या पवित्र दिवशी
मिळो तुमच्या जीवनात नवी दिशा।।
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. जसे पार्वतीने केलं कठोर तप
तसे तुम्हीही श्रद्धेने करा जीवन सुंदर
मनात असो भक्तीचे तेज
हरतालिकेच्या दिवशी लाभो सुख
शुभ हरितालिका तृतीया 2025!
9. शिवाची कृपा, पार्वतीला मिळाले वरदान
तुमचे जीवन असो सुंदर आणि महान
प्रेम आणि विश्वासाची ही गाथा
राहो आपलंही नाते चिरतरुण नाथा
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
10. देवी पार्वतीप्रमाणे तुमचेही नात्यावर असलेले प्रेम आणि श्रद्धा अढळ राहो
हरतालिका तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा!
11. पार्वती मातेची अखंड उपासना आणि शिवशंकराचे स्मरण
यामुळे तुमचे आयुष्य समाधानकारक आणि पवित्र होवो, अशी शुभेच्छा!
शुभ हरितालिका तृतीया 2025!
12. हरतालिका तृतीया म्हणजे निस्सीम भक्तीचे प्रतीक
पार्वती मातेच्या कृपेने तुमचे घर सदैव आनंदी आणि सुखी राहो
13. देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या अखंड प्रेमाचा आदर्श घेऊन
आपल्या नात्यांत देखील तीच निष्ठा, समर्पण आणि प्रेम राहो
हरतालिका तृतीयेच्या कोटी-कोटी शुभेच्छा!
14. हरितालिका तृतीया ही एक अशी संधी आहे जी भक्ती
संयम आणि श्रद्धा यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता संचार करते
शुभ हरितालिका तृतीया 2025!
15. हरितालिका तृतीया म्हणजे नात्यांतील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक
अशा या पवित्र दिवसाच्या कोटी शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world