Rudraksha Water Benefits: हिंदू धर्मात रुद्राक्षाचे (Rudraksha) खूप महत्त्व आहे. रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराचा आशीर्वाद मानला जातो. शिवशंकर देखील गळ्यामध्ये रुद्राक्षच्या माळा घालत असत. पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदिक दृष्टिकोनाव्यतिरिक्त रुद्राक्ष आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे? विशेषतः रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यास एकाच वेळेस अनेक फायदे मिळू शकतात. तज्ज्ञांकडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे?
एमडी(आयुर्वेद) डॉ. मनीषा मिश्रा यांनी इन्स्टाग्राम हँडलवर रुद्राक्षाची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय. डॉ. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्राक्ष हे एक अतिशय शक्तिशाली नैसर्गिक बीज आहे, जे आयुर्वेदातील ऊर्जा देणारे औषध देखील मानले जाते. रुद्राक्षमध्ये नैसर्गिक विद्युत चुंबकीय गुणधर्म आहेत. म्हणजेच रुद्राक्षाची रचना आणि अंतर्गत रचना अशी आहे की ते शरीराभोवती एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करते, याद्वारे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
(नक्की वाचा: सकाळी रिकाम्या पोटी केळे खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे)
रुद्राक्षचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी रुद्राक्षचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया संतुलित राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
(नक्की वाचा: Heart Health Tips: आयुष्यातील हा दाब तुमचे हृदय पाडेल पूर्णपणे बंद, हृदयाची धडधड सुरू ठेवण्यासाठी घ्या ही काळजी)
एकाग्रता
डॉ. मिश्रांच्या माहितीनुसार, रुद्राक्षच्या पाण्यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे मज्जासंस्था शांत होण्यास मदत मिळते, परिणामी तणाव, चिंता आणि मानसिक थकवा दूर होतो आणि एकाग्रतेची क्षमता सुधारण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
रुद्राक्ष परिधान केल्यास किंवा याचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
रुद्राक्षचे पाणी कसे तयार करावे?
- रुद्राक्षचे पाणी तयार करण्यासाठी रात्री एका स्वच्छ भांड्यामध्ये पाणी घ्यावे आणि त्यामध्ये एक किंवा दोन रुद्राक्षच्या बिया ठेवाव्या.
- पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
- नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास मानसिक आणि शारीरिक लाभ मिळू शकतील.
- महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्या आजारावर औषधोपचार करत असाल तर हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)