India Air Pollution: वायू प्रदुषणामुळे आरोग्याशी संबंधित विविध गंभीर समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ श्वासोच्छवासाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचे आजार इत्यादी. नुकतेच करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे सूक्ष्म कणासह प्रदूषित हवेच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. या सूक्ष्म कणांची रुंदी मायक्रॉन किंवा त्याहून कमी असते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लॅन्सेट या मेडिकल जर्नलने केलेल्या रीसर्चमधील माहितीनुसार, टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 20 टक्के प्रकरणे पीएम 2.5 प्रदूषकांच्या (Particulate Matter) दीर्घकाळ संपर्काशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे. हे सूक्ष्म प्रदूषक तेल, डिझेल, बायोमास आणि गॅसोलीन जाळल्याने उत्सर्जित होतात. देशातील नागरिकांची मोठी संख्या आरोग्यास हानिकारक असलेल्या वायूच्या संपर्कामध्ये येत आहे, या दृष्टीकोनातून हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत आहे.
(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)
लॅन्सेट या मेडिकल जर्नलचे रीसर्च
पीएम 2.5 प्रदूषकांना बहुतांश वेळेस 'किलर' असे म्हटले जाते आणि हे शहरी भागातील वायू प्रदूषणामागील प्रमुख घटक आहेत. रीसर्चमधील माहितीनुसार, पीएम 2.5 प्रदूषकांच्या (PM 2.5) संपर्कात आल्याने तुमच्या शरीरातील ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमवर परिणाम होतो आणि यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढतो. परिणामी हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.
टाइप 2 मधुमेहाचा मोठा धोका
अभ्यासादरम्यान असेही निदर्शनास आले आहे की, पीएम 2.5 प्रदूषकांच्या जवळपास महिनाभर संपर्कामध्ये राहिल्यास शरीरातील रक्तशर्करेचा स्तर वाढतो आणि दीर्घकाळ (जवळपास एक वर्ष) संपर्कात राहिल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका 20 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: बॉयफ्रेंडला करायची शेकडो कॉल-मेसेज, उत्तर न मिळाल्यास वागायची विचित्र! डॉक्टर म्हणाले-Love Brainची समस्या)
आजाराबाबात लोक अनभिज्ञ
जवळपास 537 मिलियन लोक टाइप 2 मधुमेह या आजाराने ग्रस्त आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे आपल्याला मधुमेहाने ग्रासलंय, या माहितीबाबतच निम्मे लोक अनभिज्ञ असतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, भारतामध्ये 18 वर्षांवरील अंदाजे 77 दशलक्ष लोक मधुमेह (टाइप 2) आजाराने ग्रस्त आहेत आणि सुमारे 25 दशलक्ष लोकांना प्री-डायबेटीज म्हणजे भविष्यात मधुमेह होण्याचा मोठा धोका आहे.
भारतीय शहरांमध्ये प्रदूषित हवा
जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार, बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगरीय क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, तर नवी दिल्लीची ओळख सर्वात वाईट हवेच्या गुणवत्तेसह राजधानीचे शहर म्हणून झाली आहे. वर्ष 2018 पासून चार वेळा नवी दिल्लीला (New Delhi) जगातील सर्वात प्रदूषित राजधानी असल्याची माहिती रिपोर्टद्वारे समोर आली आहे.
VIDEO: बड्या कंपन्यांच्या हेल्थ ड्रींक मुलांसाठी घातक?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world