जाहिरात

Weight Loss Drink: शरीरातील अतिरिक्त चरबी घटवणारे 'मॅजिकल ड्रिंक', सलग 30 दिवस पेय प्यायल्यास काय होईल?

Weight Loss Drink: न्युट्रिशनिस्ट देवयानी यांनी इन्स्टाग्रामवर मॅजिकल ड्रिंकबाबतची माहिती शेअर केलीय, ज्याद्वारे शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळते.

Weight Loss Drink: शरीरातील अतिरिक्त चरबी घटवणारे 'मॅजिकल ड्रिंक', सलग 30 दिवस पेय प्यायल्यास काय होईल?
"Weight Loss Tips: शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय"

Weight Loss Drink: वजन वाढीच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. वेटलॉस करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. कितीही प्रयत्न केले तरी त्याचे शरीरावर चांगले परिणाम झालेले दिसत नाहीत. तुम्हाला देखील याच गोष्टींचा अनुभव येतोय का? तर या लेखामुळे तुम्हाला मदत मिळू शकते. न्युट्रिशनिस्ट देवयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेटलॉसशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओद्वारे त्यांनी मॅजिकल ड्रिंकची माहिती शेअर केलीय. वजन कमी करण्यासाठी ड्रिंक कसे तयार करावे, याद्वारे शरीराला कोणते फायदे मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

मॅजिकल ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारी सामग्री | Magical Drink Recipe

  • तीन चमचे मेथीचे दाणे (Methi dana)
  • तीन चमचे हळद पावडर (Haldi)
  • तीन चमचे ओवा (Ajwain)
  • तीन चमचे बडिशेप 
  • दोन तुकडे दालचिनी (Cinnamon sticks) 

मॅजिकल ड्रिंक कसे तयार करावे?

  • सर्व सामग्री एकत्रित करुन मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. 
  • तयार झालेली पावडर एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करा.  
  • जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी एक मोठा चमचा वाटलेली पावडर अर्ध्या ग्लास कोमट पाण्यात मिक्स करुन ते पाणी पिण्याचा सल्ला न्युट्रिशनिस्टने दिलाय.  

मॅजिकल ड्रिंकमुळे कोणते फायदे मिळतात? | Magical Drink  Benefits For Weight Loss 

  • शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळते.  
  • हळद आणि दालचिनीमुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते.  
  • बडिशेप आणि ओव्यामुळे गॅस, ब्लॉटिंग आणि अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 
  • मेथीच्या बियांमुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, या परिस्थितीत शरीराची ऊर्जा शरीरामध्ये जमा झालेले अतिरिक्त फॅट्स बर्न करण्याचे काम करते. आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते
  • वरील सर्व सामग्रीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि डिटॉक्स गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Ghee Benefits: तुपाचे 7 जबरदस्त फायदे, आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कसा करावा? वाचा सविस्तर माहिती

(नक्की वाचा: Ghee Benefits: तुपाचे 7 जबरदस्त फायदे, आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कसा करावा? वाचा सविस्तर माहिती)

या गोष्टींची काळजी घ्या

न्युट्रिशनिस्ट देवयानीने दिलेल्या माहितीनुसार,  मॅजिकल ड्रिंकमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण एका रात्रीत बदल घडून येणार नाहीत. यासाठी तुम्हाला उपचार पद्धतीमध्ये सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे. सलग 30 दिवस दिवसभरात दोन वेळा पेय तयार करुन प्यावे. महिनाभर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. 

Benefits of Salt Bath: मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास काय होईल? मिठाचा कसा वापर करावा

(नक्की वाचा: Benefits of Salt Bath: मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास काय होईल? मिठाचा कसा वापर करावा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com