
How Many Times To Chew Food: आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हा ते नीट चावून खाणे महत्त्वाचे असते. बऱ्याचदा आपण घाईघाईने जेवतो. पण असे करणे पचनासाठी चांगले नाही. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक घास 32 ते 36 वेळा चावून खाल्ल्यास अन्न लवकर पचते आणि शरीराला पोषक तत्त्वेही मिळतात. त्यामुळे अन्न खाताना ते 32 ते 36 वेळा नक्की चावावे. ते आपल्या आरोग्यासाठी आणि पचन संस्थेसाठी चांगले ठरते असं तज्ज्ञ सांगतात.
जेव्हा आपण अन्न नीट चावतो, तेव्हा ते लाळे (saliva) सोबत चांगले मिसळते. लाळेमध्ये असलेले एन्झाईम्स (enzymes) अन्न लहान तुकड्यांमध्ये तोडतात. या मुळे पचन सोपे होते. जास्त चघळल्याने पोटावरचा ताण कमी होतो. कारण अन्न आधीच मऊ झालेले असते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यांसारख्या समस्या कमी होतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, सर्वांनी अन्न हळूहळू आणि 32 ते 36 वेळा चघळून खावे, जेणेकरून पोट हलके राहील आणि शरीर निरोगी बनेल.
हे 5 पदार्थ लवकर पचतात आणि शरीराला नुकसान पोहोचवत नाहीत
डाळ आणि खिचडी:
हे दोन्ही हलके आणि साधे अन्न मानले जातात. यात फायबर आणि प्रथिने संतुलित प्रमाणात असतात. विशेषतः मूग डाळीची खिचडी आजारी लोकांसाठीही फायदेशीर मानली जाते.
उकडलेल्या भाज्या:
गाजर, दुधी भोपळा, पडवळ, दोडका यांसारख्या भाज्या उकडून खाल्ल्यास त्या खूप लवकर पचतात. यात फायबर जास्त असल्याने ते आतड्यांसाठी खूप चांगल्या समजल्या जातात.
फळे (जसे पपई, केळी, सफरचंद):
फळे नैसर्गिकरित्या पाणी आणि फायबरने समृद्ध असतात. पपईमध्ये तर खास पचनाचे एन्झाईम्स असतात. ते अन्न पचण्यास मदत करतात. फळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी खाणे चांगले असते.
दही:
दही एक प्रोबायोटिक फूड आहे. म्हणजेच यात चांगले बॅक्टेरिया असतात जे पोटाचे आरोग्य सुधारतात. हे पोट थंड ठेवते आणि गॅस, अपचनापासून आराम देतात.
रव्याचा शिरा किंवा उपमा:
रव्यापासून बनवलेला शिरा किंवा उपमा हलका असतो. शिवाय तो लवकर पचतो. यात जास्त मसाले नसल्यामुळे ते पचनासाठी फायदेशीर ठरते.
जर तुम्ही अन्न हळूहळू आणि 32-36 वेळा चावून खाल्ले, तर तुमचे पचन चांगले राहीलच, पण लठ्ठपणा, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्याही दूर होतील. तसेच, वर नमूद केलेले हलके आणि लवकर पचणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा जेणेकरून तुमचे पोट नेहमी निरोगी राहील आणि शरीर ऊर्जावान बनेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world