- व्हाइट डिस्चार्ज हा मासिक पाळीच्या आधी, नंतर किंवा ओव्हुलेशनच्या वेळी सामान्य असतो
- शरीरात कफ दोष वाढल्याने आणि पचनक्रिया बिघडल्याने व्हाइट डिस्चार्जची समस्या निर्माण होऊ शकते
- व्हाइट डिस्चार्जची समस्या असामान्य वाटल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे
- डॉ. रुचा पै
White Discharge: महिलांमध्ये पांढरे पाणी जाणे म्हणजेच 'व्हाइट डिस्चार्ज' ही एक सामान्य समस्या आहे. पण मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर तसेच ओव्हुलेशनच्या काळाव्यतिरिक्त दररोज जाडसर पांढरे पाणी जाणे, त्याला घाणेरडा वास येणे ही बाब आरोग्यासाठी चिंताजनक ठरू शकते. यामुळे पाठदुखी, पायात गोळे येणे आणि सतत थकवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदानुसार शरीरात कफ दोष वाढल्याने आणि पचनक्रिया बिघडल्याने हा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डॉ. रुचा पै यांनी उपचारांसह दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...
अंगावरून पांढरं पाणी जातं का? हे 3 घरगुती उपाय आजच करून बघा
डॉ. रुचा पै म्हणाल्या की,माझ्याकडे आलेली एक रुग्ण, 32 वर्षांची तरुणी दररोज White Discharge आणि सतत थकवा अशी समस्या तिला होती.
White Discharge कसा असतो?
- कांदा-लसणीसारखा वास
- दह्यासारखं जाडसर
- काहींना नेहमी या समस्येचा सामना करावा लागतो
व्हाइट डिस्चार्जची लक्षणे | White Discharge Symptoms
- अतिशय पाठदुखी
- पायात गोळे येणे
- सतत थकवा
- वजन कमी होणे
व्हाइट डिस्चार्जची समस्या सामान्य कधी असते?
- 5 दिवस - पाळी येण्यापूर्वी / पाळी आल्यानंतर
- Ovulationच्या वेळेस अंगावरून पांढरे पाणी जाणे सामान्य असते.
- यापलीकडे होत असेल तर उपचार आवश्यक आहेत.
कारण काय असू शकते?
बिघडलेले पचन, शरीरात कफ प्रकोप त्यामुळे व्हाइट डिस्चार्ज आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हे 3 उपाय रोज करा
1. तांदुळाचं धुवण
- तांदूळ पाण्याने धुऊन घ्या
- ते पाणी 1 तास ठेवा
- तांदूळ बाजूला, फक्त पाणी प्यावे
2. आवळ्याचा स्वरस
- ताज्या आवळ्याचा स्वरस काढा
- त्यात थोडा मध मिक्स करा
- रोज सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण प्यावे
(नक्की वाचा : Excessive Sweating Causes: उन्हाळ्यात जास्त घाम येतोय? थकवाही जाणवतोय? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाच डॉ. पै यांनी दिलेली माहिती)
3. आयुर्वेदिक उपचार
शरीरातील कफ कमी करणारे योग्य उपचार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
या गोष्टीही टाळा
आहारातून दही, थंड पदार्थ,गोड पदार्थ, तेलकट पदार्थ आणि शिळ अन्नाचं सेवन करणं टाळा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world