Ginger Water For Bad Cholesterol: शरीर निरोगी राहावे, यासाठी आता लोक कित्येक महागडे उपाय करतात. शरीरामध्ये वाढलेल्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर सकाळी रिकाम्या पोटी एक खास पेय तयार करून प्यावे. शरीरामध्ये चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल अशा दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात, हे तुम्हाला माहितीये का? कोलेस्टेरॉल म्हणजे शरीरातील पेशींमध्ये आढळणारा मेण किंवा चरबीसारखा असणारा घटक होय. शरीरामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकार आणि स्ट्रॉक येण्याचा धोका वाढू शकतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया...
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी आल्याचा कसा करावा वापर? (Is Ginger Water Control Bad Cholesterol)
आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आल्याचे पाणी (Ginger Water Benefits) प्यायल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. कारण आल्यामध्ये बायोअॅक्टिव्ह कम्पाउंड उदाहरणार्थ जिंजरोल हे एलडीएल (खराब कोलेस्टरॉल) आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.
(नक्की वाचा: High Cholesterol Remedy: कोलेस्टेरॉल पटकन होईल गायब, हृदय लोखंडासारखे मजबूत होईल; या 7 चमत्कारिक पदार्थांचे करा सेवन)
आल्याचे पाणी कसे तयार करावे? (How To Make Ginger Water)
- सर्वप्रथम ग्लासभर पाणी एका पॅनमध्ये गरम करत ठेवा.
- पाण्यात आल्याचे तुकडे किंवा किसलेले आले मिक्स करावे.
- पाणी व्यवस्थित उकळू द्यावे.
- पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करावा.
- आल्याचे पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून प्यावे.
(नक्की वाचा: Health Tips: कोणत्या धान्याची पोळी खाल्ल्यास कोलेस्टेरॉलची समस्या होईल कमी)
आल्याचे पाणी पिण्याचे फायदे (Ginger Water Benefits)
- सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- आल्याच्या पाण्यामुळे पचनप्रक्रिया, शरीराला आलेली सूज आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
- आल्याच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास, रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)