
Chia seeds in Marathi: चिया सीड्समध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे आणि याद्वारे असंख्य शारीरिक लाभ देखील मिळतात. चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि विविध खनिजांचा मोठा साठा आहे. मर्यादित स्वरुपात चिया सीड्सचे सेवन केले नाही तर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
चिया सीड्स खाण्याचे फायदे | Benefits of Chia Seeds In Marathi
1. हृदयाचे आरोग्य : चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे घटक जास्त प्रमाणात असतात, यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ते पोषक मानले जातात.
2. पचनसंस्था : चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनपक्रियेसाठी फायदेशीर असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास चिया सीड्सचे सेवन करू शकता.
3. हाडांचे आरोग्य : कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फास्फरसचे उत्तम स्त्रोत म्हणजे चिया सीड्स. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
4. ऊर्जा आणि चयापचयाची क्षमता : चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण आहे, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्तशर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहते. महत्त्वाचे चयापचयाची गती अधिक वेगवान होते.
(नक्की वाचा: Chia Seeds Benefits: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ, सकाळी की संध्याकाळी? शरीराला मिळतील मोठे फायदे)
5. जुन्या आजारांपासून सुटका : चिया सीड्समध्ये क्वेरसेटिन, केम्फेरॉल आणि क्लोरोजेनिक अॅसिड यासारख्या अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे. या घटकांमुळे दीर्घकालीन आजार आणि अकाली वृद्धत्वाचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
6. त्वचा होईल सुंदर: चिया सीड्मधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्वचा निरोगी, चमकदार राहण्यासही मदत मिळते.
7. वेटलॉस : चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Chia Seeds Water Benefits: चिया सीड्सचे पाणी रिकाम्या पोटी कसे प्यावे?)
चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत | How To Eat Chia Seeds In Marathi
- रात्रभर ग्लासभर पाण्यात एक किंवा दोन चमचे चिया सीड्स भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यासह चिया सीड्सचे सेवन करावे. पाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठरवावे.
- दुधामध्येही चिया सीड्स भिजत ठेवून तुम्ही खाऊ शकता.
- कोरड्या स चिया सीड्स खाण्याची चूक करू नये.
तज्ज्ञांकडूनही जाणून घ्या चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत CHIA SEEDS VIDEO
चिया सीड्स खाण्याचे दुष्परिणाम | Disadvantages of Chia Seeds In Marathi
- जास्त प्रमाणात चिया सीड्स खाल्ल्यास दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
- चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
- गॅस होणे
- बद्धकोष्ठतेची समस्या
- श्वास गुदमरण्याची समस्या
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world