जाहिरात

सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही छोटी-छोटी पाने, स्पर्शही करणार नाही या 4 गंभीर समस्या

Imli Leaves Benefits: निसर्गाने आपल्याला अशा कित्येक गोष्टी दिल्या आहेत, ज्याद्वारे केवळ आरोग्यास कित्येक औषधी गुणधर्मांचा पुरवठा होता. शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही छोटी-छोटी पाने, स्पर्शही करणार नाही या 4 गंभीर समस्या
Tamarind Leaves Benefits: चिंचेची पाने खाण्याचे फायदे

Imli Leaves Benefits: चिंचेचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. कित्येक पाककृतींमध्येही चिंचेचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का चिंचेच्या पानांमध्येही आयुर्वेदिक गुणधर्मांचा साठा आहे. रिकाम्या पोटी चिंचेची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो, हा उपाय केल्यास शरीराला असंख्य लाभ मिळतील. चिंचेच्या पानांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे. या पोषणतत्त्वांमुळे शरीराचे कित्येक समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.   

चिंचेची पाने खाण्याचे फायदे (Chinchechi Pane Khanyache Fayde)

1. पचनप्रक्रिया 

चिचेंची पानांमुळे अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास सकाळी रिकाम्या पोटी चिंचेच्या पानांचे सेवन करावे. 

Latest and Breaking News on NDTV

2. दातांचे आरोग्य

चिंचेच्या पानांमुळे तोंडाला येणारा दुर्गंध आणि दातांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते. दातांशी संबंधित कित्येक समस्या सहज दूर होऊ शकतील. 

3. केस

केसांची वाढ व्हावी, यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांचा वापर करू शकता. चिंचेच्या पानांची पेस्ट तयार करुन केसांवर लावा. 

Vitamin B12चा खजिना आहेत ही छोटीशी पाने, अंडी-चिकनपेक्षाही पावरफुल

(नक्की वाचा: Vitamin B12चा खजिना आहेत ही छोटीशी पाने, अंडी-चिकनपेक्षाही पावरफुल)

4. सर्दी-खोकला 

चिंचेच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला यासारख्या आजारांपासून सुटका होऊ शकते. बदलत्या हवामानानुसार शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होत असतात, परिणामी सर्दी-खोकल्यासारख्या समस्या देखील त्रासदायक ठरतात. 

Linguda Benefits: बीपीपासून ते पचनप्रक्रियेसाठी वरदान आहे विचित्र दिसणारी हिरवी भाजी, तुम्हाला माहितीय का नाव?

(नक्की वाचा: Linguda Benefits: बीपीपासून ते पचनप्रक्रियेसाठी वरदान आहे विचित्र दिसणारी हिरवी भाजी, तुम्हाला माहितीय का नाव?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com