ताकात काळे मीठ मिक्स करुन रोज प्यायले तर काय होईल? हा फायदा कोणालाच नाही माहीत

Benefits Of Butter Milk With Black Salt: उन्हाळ्यामध्ये ताक पिणे फायदेशीर मानले जाते. पण ताकामध्ये काळे मीठ मिक्स केल्यास कोणते लाभ मिळतील हे तुम्हाला माहितीये का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Natural summer tonic: ताकामध्ये काळे मीठ मिक्स केल्यास काय होते?

Benefits Of Butter Milk With Black Salt: उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक डाएटमध्ये ताकाचा समावेश करतात. ताकामध्ये प्रोटीम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन B12 सह कित्येक प्रकारच्या पोषणतत्त्वांचा साठा आहे. ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. ताक पचनासही हलके असते, यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. ताकामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यासह रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. पण ताकामध्ये थोडेसे काळे मीठ मिक्स केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का?  जाणून घेऊया फायदे... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ताकामध्ये काळे मीठ मिक्स करुन प्यायल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील? (Health benefits of butter milk with black salt)

पचनप्रक्रिया सुधारते

पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर ताकामध्ये काळे मीठ मिक्स करुन पिणे फायदेशीर ठरेल. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असते आणि त्यामध्ये काळे मीठ मिक्स केल्यास शरीरास आवश्यक असणारे एंझाइम्स वाढतात, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. काळ्या मिठासह थोडेशी ओव्याची पावडरही मिक्स करू शकता. 

शरीर राहील हायड्रेट 

ताकातील इलेक्ट्रोलाइट्स गुणधर्मामुळे शरीर थंड राहण्यास आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळते. एकूणच शरीर हायड्रेट राहते.

रोगप्रतिकारकशक्ती 

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यासाठी आतडे आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहणे आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता त्याचे पचन होऊन त्याद्वारे शरीराला ऊर्जा मिळते.  

Advertisement

(नक्की वाचा: Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन)

पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते

ताकातील अ‍ॅसिडमुळे पोट योग्य पद्धतीने स्वच्छ होण्यास मदत मिळते. ताक नियमित प्यायल्यास पोटाशी सबंधित आजार दूर होण्यास मदत मिळू शकते. 

ताक पिण्याची योग्य वेळ

उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस ताक पिणे फायदेशीर ठरेल. दुपारच्या जेवणानंतर 15-20 मिनिटांनंतर ताक प्यावे. ताकामध्ये काळे मीठ मिक्स करायला विसरू नका. यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत)

जास्त प्रमाणात ताक पिणे टाळा 

ताक आरोग्यासाठी चांगले असले तरीही जास्त प्रमाणात पिणे टाळावे. अन्यथा अतिसाराच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )