जाहिरात

Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत 

Weight Loss Tips: तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी साधा आणि सोपा उपाय शोधत आहात का? तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.  

Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत 
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी कोणत्या पिठाचे सेवन करावे?

Weight Loss Tips In Marathi: वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. सडपातळ राहण्यासाठी लोक जिम, डाएट प्लानसह वेगवेगळ्या पेयांचाही आधार घेतात. पण पौष्टिक आहाराचे सेवन कसे करावे आणि किती प्रमाणात करावे, याबाबत योग्य माहिती नसल्याने वजन कमी होण्याऐवजी ते वाढतच जाते. तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय शोधताय का? तर डाएटमध्ये एका सुपरफुडचा समावेश करू शकता. डाएटिशियनने दिलेल्या माहितीनुसार चण्याचे पीठ (Sattu Benefits) वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. चण्याच्या पिठाचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चण्याच्या पिठाचे सेवन करण्याची योग्य पद्धत 

डाएटिशियन सोनिया नारंगने दिलेल्या माहितीनुसार, चण्याच्या पिठामध्ये प्रोटीन आणि फायबर अधिक प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही घटक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. पण चण्याच्या पिठाचे योग्य पद्धतीने सेवन करणे आवश्यक आहे, अन्यथा याचे परिणाम उलट होऊ शकतात.

सोनिया नारंगने दिलेल्या माहितीनुसार,  एका स्कूप व्हे प्रोटीनद्वारे शरीराला सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन मिळतात. तर 100 ग्रॅम चण्याच्या पिठापासूनही जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन मिळते. पण व्हे प्रोटीनमध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते, म्हणूनच व्हे प्रोटीनचे पचन पटकन होते. दुसरीकडे चण्याच्या पिठामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते पचण्यास आणि शरीरामध्ये शोषले जाण्यास जास्त वेळ लागतो.

Weight Loss Tips: या पिठामुळे 20 पट जलदगतीने फॅट्स होतील बर्न, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेला उपाय

(नक्की वाचा: Weight Loss Tips: या पिठामुळे 20 पट जलदगतीने फॅट्स होतील बर्न, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेला उपाय)

आपल्या शरीराला एका दिवसासाठी केवळ 30 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. म्हणूनच जर तुम्ही एकाच वेळेस 15 ग्रॅम फायबरयुक्त आहाराचे सेवन केले तर त्याचे योग्यरित्या पचन होत नाही. परिणामी गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन, पोटदुखी किंवा उलट्यांची समस्या उद्भवू शकते; असेही सोनिया नारंगने सांगितले.  

चण्याच्या पिठामुळे खरंच वजन कमी होते?

सोनिया नारंगने दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी एकाच वेळेस चण्याच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ किंवा पेय पिणे टाळा. दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने पदार्थांचे सेवन करावे. चण्याच्या पिठाचे पेय तयार करून तुम्ही दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात ते पिऊ शकता, असे केल्यास त्याचे पचन सहजरित्या होईल आणि महत्त्वाचे म्हणजे शरीराचे कोणतेही नुकसान न होता वजन कमी करण्यास मदत मिळेल.

Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने 4 महिन्यात घटवले तब्बल 25 किलोग्रॅम वजन, फॅट्स कमी करण्यासाठी सांगितले 4 उपाय

(नक्की वाचा: Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने 4 महिन्यात घटवले तब्बल 25 किलोग्रॅम वजन, फॅट्स कमी करण्यासाठी सांगितले 4 उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )