Coriander Seeds Water Benefits: रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे 4 मोठे फायदे, कसे तयार करावे पाणी?

Coriander seeds Water Benefits: धन्याचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Coriander seeds Water Benefits: धन्याचे पाणी पिण्याचे फायदे"
Canva

Coriander seeds Water Benefits: भारतीय पाककृतींमध्ये धण्याचा वापर आवर्जून केला जातो, यामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय शरीराला औषधी गुणधर्माचाही पुरवठा होतो. धण्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शिअम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. धणे पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यायल्यास शरीर आतील बाजूने डिटॉक्स होण्यास मदत मिळते आणि कित्येक आजारांपासूनही संरक्षण होण्यास मदत मिळते. नियमित धण्याचे पाणी प्यायल्यास काय होते, जाणून घेऊया माहिती....

सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील? 

पचनप्रक्रिया

धण्याचे पाणी पोटाच्या आरोग्यासाठी वरदान आहे. यातील पोषणतत्त्वांमुळे पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ गॅस, पोटामध्ये होणारी जळजळ, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका होईल. पोटाच्या समस्येमुळे त्रासलेले लोक धण्याचे पाणी पिऊ शकतात.  

वेटलॉस 

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी धण्याचे पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. धण्याच्या पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील आणि शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल. यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होतील आणि वजन सहजरित्या घटण्यास मदत मिळेल. 

रक्तशर्करा 

धण्याच्या बियांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, मधुमेहग्रस्तांसाठी धण्याचे पाणी हे नैसर्गिक रामबाण उपाय आहे. 

(नक्की वाचा: Amla Juice Benefits: सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल?)

सतेज त्वचा

धण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. धण्याच्या पाण्यामुळे मुरुम, त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते.  

Advertisement

(नक्की वाचा: Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी)

धण्याचे पाणी कसे तयार करावे?

रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा दोन चमचे धणे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )