Ghee Benefits: तुपामुळे स्वयंपाक चविष्ट होतोच शिवाय आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. काही लोक तूप पोळी, डाळ-भाजी किंवा फोडणीसाठीही तुपाचा वापर करतात. तुपामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन Kसह फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि लोह यासारख्या पोषणतत्त्वांचाही समावेश आहे. तुपाचे नियमित सेवन केल्यास पचनप्रक्रिया मजबूत होण्यास आणि हाडे निरोगी राहण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील. सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट अमृत डेओलने याबाबतची माहिती देणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास कोणते फायदे मिळतील?
1. पचनप्रक्रिया
पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून पाणी प्यावे. यामुळे आतड्यांची स्वच्छता होईल आणि पचनप्रक्रिया मजबूत होईल. तसेच अन्नाचं पचनही सहजरित्या होतं.
2. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता
अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास किंवा पोट स्वच्छ होत नसल्यास तुपाच्या पाण्याचा उपाय करावा. कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास अॅसिडिटी दूर होईल आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळेल.
3. सांधेदुखी
वाढत्या वयानुसार किंवा हिवाळ्यामुळे बहुतांश लोक सांधेदुखीच्या समस्येमुळे हैराण असतात. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे सांधे मजबूत होतील तसेच हाडांना नैसर्गिक वंगणही मिळेल.
(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही)
4. चेहऱ्यावरील डागनियमित तूप खाल्ल्यास शरीर डिटॉक्स होईल. शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील. यामुळे त्वचेला असंख्य फायदे मिळतील, त्वचेवर नैसर्गिक तेज येऊन डागांची समस्या दूर होईल.
(नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय)
5. वेटलॉसवजन कमी करायचं असेल तर कोमट पाण्यात तूप मिक्स करून पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहील आणि अतिरिक्त खाद्यपदार्थांचे सेवन होणार नाही. पण मर्यादित स्वरुपातच तुपाचं सेवन करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.