Better Sleep Tips: धकाधकीच्या जीवनात पुरेशा प्रमाणात झोप घेणे ही बाब अतिशय आव्हानात्मक ठरतेय. लोक तास-न्-तास कूस बदलत राहतात, पण काही केल्या झोप येत नाही. सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी थकवाच अधिक जाणवतो. मोबाइलची स्क्रीन, रात्री उशीरापर्यंत काम करणे, तणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे झोपेवर दुष्परिणाम होतात. काही लोक लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात, पण मेंदू शांत होत नाही. तुम्ही देखील या समस्येचा सामना करताय का? तर या लेखाद्वारे रामबाण घरगुती उपाय जाणून घेऊया...
रात्री झोपण्यापूर्वी केवळ एक चमचा तुपाचे सेवन करावे. तुपातील पोषणतत्त्वांमुळे झोप येण्यास मदत मिळते, असं म्हणतात. आयुर्वेदानुसार तुपामुळे मेंदू आणि मज्जासंस्था शांत होण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळू शकते.
रात्री तुपाचे सेवन करणे फायदेशीर का मानले जाते? | Why Is Ghee Beneficial at Night?
1. मेंदू शांत होतो
तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो. तणाव कमी होतो आणि झोप येण्यास मदत मिळते.
2. पचनप्रक्रिया सुधारते
रात्री खाल्लेल्या अन्नाचे पचन न झाल्यास झोपेवर परिणाम होतात. तुपामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि आतड्यांना आराम मिळतो, ज्यामुळे गाढ झोप लागते.
3. हार्मोन्सची पातळी संतुलित होईल
तुपामुळे शरीरामध्ये मेलाटोनिन हार्मोनचा स्त्राव होण्यास मदत मिळते, शरीरामध्ये या हार्मोनची पातळी संतुलित असेल तर गाढ झोप येते.
कसे आणि कधी करावे तुपाचे सेवन?
- रात्री झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटांपूर्वी एक चमचा तुपाचे सेवन करावे.
- दुधामध्ये तूप मिक्स करून पिऊ शकता.
- एक चमचा तूप पुरेसे आहे, त्यापेक्षा जास्त प्रमाणात तूप खाऊ नये.
(नक्की वाचा: Garlic With Desi Ghee Health Benefits: लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास काय होतं?)
कोणी तुपाचे सेवन नक्की करावे?
- रात्री झोप न येण्याची समस्या
- वारंवार झोप मोडण्याची समस्या
- चिंता, अतिविचार करणे किंवा तणावामुळे झोप न येणे
- सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणे
(नक्की वाचा: Winter Health News: हिवाळ्यात दारू पिऊ शकतो? एका दिवसात किती दारू प्यावी, 99% लोकांना माहितीच नाहीय अचूक उत्तर)
एक चमचा तुपाचे सेवन केल्यास काय बदल होतील?सलग 7–10 दिवस हा उपाय कोणते बदल होतील...
- झोप लवकर येईल.
- रात्री वारंवार झोप मोडणार नाही.
- सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटेल.
- मेंदू शांत राहील आणि तणाव कमी होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

