
Sitting And Eating On Floor Benefits: बदलत्या लाइफस्टाइलनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि पद्धतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी लोक जमिनीवर बसून जेवण करत असत, पण आता बहुतांश लोक डायनिंग टेबल, सोफा किंवा बेडवर बसून जेवण करुन पसंत करतात. पण जमिनीवर बसून जेवल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतात, हे तुम्हाला माहितीय का? याउलट बेडवर बसून खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास कित्येक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे काय आहेत, सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले पाहिजे? तसेच बेडवर बसून जेवण करणं का टाळले पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
जमिनीवर बसून जेवण केल्यास कोणते फायदे मिळतील? (Eating Sitting Down Benefits)
जमिनीवर बसून जेवण केल्यास शरीर नैसर्गिकरित्या लवचिक राहण्यास मदत मिळते. मांडी घालून जमिनीवर बसल्यास पचनसंस्था सक्रिय होते. योगमध्ये या स्थितीस सुखासन असे म्हणतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. शरीराचे स्नायू योग्य पद्धतीने ताणले जातात आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुधारते. तसेच पोटामध्ये जास्तीचे खाद्यपदार्थ जात नाहीत.
जमिनी बसून जेवणं का चांगले मानले जाते? (Is it Good to Eat Sitting Down)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जमिनीवर बसून जेवणं ही आरोग्यदायी सवय आहे. सुखासनामुळे तुमचे मन आणि आतड्यांमधील संबंध मजबूत होतात. जमिनीवर बसून जेव्हा तुम्ही हळूहळू जेवता त्यावेळेस मेंदूला पोट भरल्याचे संकेत मिळतात, परिणामी शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय पाठीचा कणा आणि सांध्यासाठी ही पद्धत लाभदायक ठरते. मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या आजारांपासून आराम मिळू शकतो.
सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले पाहिजे? (What Should Eat Empty Stomach)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सकाळी रिकाम्या पोटी पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन केले तर आरोग्य आणि शरीराच्या ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. यानंतर भिजवलेले बदाम, मनुके, अक्रोड किंवा अंजीर खाणे फायदेशीर ठरेल. पपई खाल्ल्यास त्वचा आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारेल. गरम दूध किंवा हळदीचे दूध प्यायल्यास शरीर डिटॉक्स होईल आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होण्यास मदत मिळेल.

Photo Credit: iStock
बेडवर बसून जेवण करणं का टाळावे? (Why Should not Eat on Bed)
बेडवर बसून जेवणं ही अतिशय चुकीची सवय मानली जाते. बेडवर बसताना शरीराचे पोश्चर योग्य नसते, यामुळे घास चावणे आणि अन्नाच्या पचनप्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी अॅसिडिटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जेवताना बेडवर अन्नपदार्थांचे कण पडू शकतात, यामुळे बेड घाण होईल. मुंग्या येणे, जंतू संसर्गाचाही धोका वाढू शकतो.
बेडवर बसून जेवल्यास काय होते? (What Happens Eat Food on Bed)
नियमित स्वरुपात बेडवर बसून जेवल्यास तुमची पचनसंस्था हळूहळू कमकुवत होऊ शकते. यामुळे लठ्ठपणा, झोपेवरही परिणाम होऊ शकतात. बेडवर बसून जेवल्यास पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे पाठदुखी, सांधेदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच बेड घाण होईल, यामुळे अॅलर्जी, त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: 15 दिवस दुधात उकळून खा हा पांढरा पदार्थ, त्वचेपासून ते वेटलॉसपर्यंत मिळतील असंख्य फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world