Vrikshasana Benefits: पाय, गुडघे आणि पाठीचा कणा होईल मजबूत; फक्त करा हा एक उपाय

Vrikshasana Benefits: पाय, गुडघे आणि पाठीच्या कण्याशी संबंधित समस्यांचा सामना करताय का? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Vrikshasana Benefits: वृक्षासनाचे सराव करण्याचे फायदे"
Canva

Vrikshasana Benefits: नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच मानसिक आरोग्यासही असंख्य फायदे मिळतील. पाय, गुडघे आणि पाठीच्या कण्याच्या त्रासातून सुटका हवी असल्यास नियमित वृक्षासनाचा सराव करावा. वृक्षासनाच्या सरावामुळे शरीर स्थिर आणि संतुलित होण्यास मदत मिळते. मानसिक ताण, लक्ष केंद्रित न होणे किंवा शारीरिक अस्थिरतेशी संबंधित समस्यांचा सामना करत असाल तर वृक्षासनाचा सराव करावा. 

वृक्ष म्हणजे झाड. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार वृक्षासमान दिसतो, म्हणूनच यास वृक्षासन असे म्हणतात. 

वृक्षासनाचा सराव करण्याचे फायदे | Vrikshasana Benefits

  • वृक्षासनाचा सराव केल्यास लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळेल. 
  • शरीरातील रक्तप्रवाह सुधारेल. 
  • शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होतील. 

आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, वृक्षासनामुळे शरीर स्थिर होईल, मन एकाग्र आणि शरीर मजबूत होण्यास मदत मिळेल. पाय, गुडघे आणि पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत मिळेल. शारीरिक आणि मानसिक ताण कमी होईल, ज्यामुळे संयम क्षमता वाढेल आणि शरीर आतील बाजूनं मजबूत होईल.   

(नक्की वाचा: Nutmeg Benefits: जायफळ खाल्ल्यास काय होतं? कसा करावा वापर, कोणते फायदे मिळतील? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली माहिती)

वृक्षासनाचा सराव कसा करावा?

  • वृक्षासनाचा सराव करताना सुरुवातीस अडथळे निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी आसनाचा सराव करताना भिंतीचा आधार घ्यावा. 
  • योगमॅटवर सरळ स्थितीत उभे राहावे. 
  • आता डावा गुडघा वाकवून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. उजवा पाय सरळ ठेवावा.
  • हात डोक्याच्या वरील बाजूने न्यावे आणि हात नमस्ते मुद्रेमध्ये ठेवावे. 
  • आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये उभे राहावे. 
  • नियमित सराव केल्यास वृक्षासनाच्या अंतिम स्थितीमध्ये तुम्ही एक मिनिटही उभे राहू शकता. 
  • यादरम्यान श्वासोच्छवासाची प्रक्रिया कुठेही रोखून ठेवू नका. 

(नक्की वाचा: Magnesium Deficiency: शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता निर्माण झाल्यास काय होतं? यावर काय उपाय करावे?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)