Nutmeg Benefits: आपल्या स्वयंपाकघरामध्ये कित्येक प्रकारचे मसाले असतात, ज्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते शिवाय आरोग्यासही असंख्य पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. या मसाल्यांमध्ये जायफळचाही समावेश आहे. जायफळमध्ये मॅग्नीज, कॉपर, मॅग्नेशिअम, लोह, झिंक, फॉस्फरस, फायबर आणि व्हिटॅमिन ए, सी, ई यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मही आहेत, ज्यामुळे पचन, झोप आणि शारीरिक वेदनांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. जायफळ खाण्याचे फायदे, जायफळ खाण्याची योग्य पद्धत याबाबत माहिती देणारा व्हिडीओ आयुर्वेदिक डॉक्टर रोबिन शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
1. चांगली झोप येण्यासाठी फायदेशीर
रात्री वारंवार झोप मोडत असेल किंवा निद्रानाशाच्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर जायफळाचे सेवन करावे. चिमूटभर जायफळ पावडर दुधामध्ये मिक्स करा आणि दूध उकळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी जायफळयुक्त दूध प्यावे.
2. चेहऱ्यावरील डाग
चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्यांपासून सुटका हवी असल्यास कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी लावा, अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. सलग काही दिवस हा उपाय केल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
3. सांधेदुखीपासून मिळेल सुटका
हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक सांधेदुखीच्या समस्येचा सामना करत असतात, या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी जायफळचा वापर करणं फायदेशीर ठरेल. यासाठी 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम जायफळची जाडसर पावडर तयार करा. यानंतर दोन्ही पावडर 100 ग्रॅम तिळाच्या तेलामध्ये मिक्स करून तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर ते गाळून एका बाटलीमध्ये भरा. या तेलाने सांध्यांचा मसाज करावा.
(नक्की वाचा: Salt Water Benefits: मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास काय होतं? किती पाण्यामध्ये किती मीठ मिक्स करावं?)
जायफळचे अन्य फायदे
पचनप्रक्रिया
पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास रिकाम्या पोटी जायफळयुक्त दूध प्यावे.
रोगप्रतिकारकशक्ती
जायफळमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. सर्दी-खोकला यासारख्या आजारांपासूनही संरक्षण होईल.
(नक्की वााचा:Ghee Benefits: रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती)
तणाव
तणाव दूर करण्यासाठी जायफळचे सेवन करणं अतिशय फायदेशीर ठरू शकते, नियमित स्वरुपात जायफळयुक्त दूध पिऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world