Magnesium Deficiency: शरीराच्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी कित्येक व्हिटॅमिन आणि खनिजांची आवश्यकता असते. म्हणूनच व्हिटॅमिन आणि खनिजांच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते. लोक विशेषतः व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि लोहयुक्त पदार्थांवर लक्ष केंद्रित करतात, पण शरीरासाठी मॅग्नेशिअम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे तत्त्व शरीरासाठी पावरहाऊसप्रमाणे कार्य करते आणि प्रत्येक पेशीला योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी ताकद देते.
शरीरासाठी मॅग्नेशिअम का आवश्यक आहे?
आयुर्वेदामध्ये मॅग्नेशिअमला धातू, ताकद आणि पचनशक्ती वाढवणारे तत्त्व म्हटले जाते, ज्यामुळे सर्व प्रक्रिया पार पाडण्यास शरीरास मदत मिळते. मॅग्नेशिअम शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळते आणि शरीराच्या प्रत्येक कामामध्ये हे तत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. हे मेंदूच्या पेशींनाही आधार देण्याचे काम करते. याव्यतिरिक्त हृदयाची ठोके स्थिर ठेवण्यात, बीपी नियंत्रणात ठेवण्यात आणि स्नायू तसेच हाडांनाही ऊर्जा देण्याचंही काम मॅग्नेशिअम करतं.
(नक्की वाचा: Nutmeg Benefits: जायफळ खाल्ल्यास काय होतं? कसा करावा वापर, कोणते फायदे मिळतील? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली माहिती)
मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे
- मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे शरीर निर्जीव झाल्यासारखे वाटू शकते.
- मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे थकवा जाणवणे.
- थोडेसे काम केल्यानंतरही दम लागणे.
- स्नायूंची समस्या, सतत पेटके येणे, झोपेशी संबंधित सम्या, हृदयाचे अनियमित ठोके आणि अस्वस्थता जाणवणे, अशा समस्या उद्भवू शकतात.
- मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे रक्तदाबही वाढू शकतो, पचनशक्ती कमकुवत होऊ शकते.
- डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो.
- महिलांमध्ये पीसीओडीची (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) समस्या निर्माण होण्याची धोका आहे.
(नक्की वाचा: Ghee Benefits: रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती)
रोज किती प्रमाणात मॅग्नेशिअमयुक्त पदार्थांचे सेवन करावे?
रोज किती प्रमाणात शरीराला मॅग्नेशिअमची आवश्यकता असते, असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर पुरुषांसाठी नियमित 400-420 एमजी तर महिलांसाठी 300-320 एमजी मॅग्नेशिअमची आवश्यकता असते. गर्भवती महिलासाठी 360 एमजीपर्यंत मॅग्नेशिअमची गरज असते.
मॅग्नेशिअम डाएट किंवा सुकामेव्यांद्वारे मिळू शकते. भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, पालक, केळी, राजमा, काजू, शेंगदाणे, बदाम यासारख्या गोष्टींमधून शरीराला मॅग्नेशिअमचा पुरवठा होईल. नियमित सुकामेव्याचे सेवन करावे. सुकामेवा रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करावे. सुकामेवा भिजवून खाल्ल्यास त्यातील टॅनिन बाहेर फेकले जाते आणि सहजरित्या पचन होण्यास मदत मिळते.
(Content Source IANS)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

