Stomach Cleansing Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नसल्याच्या तक्रारीमुळे कित्येक जण हैराण असतात. पोट स्वच्छ न झाल्यास पोटदुखी, पोट फुगणे, पोट जड वाटणे, कमकुवतपणा, थकवा किंवा आळस यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही देखील उपाय शोधताय? आतड्यांसाठी आयुर्वेदातील रामबाण उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण, याद्वारे शरीरास कोणते लाभ मिळतील, याबाबत माहिती जाणून घेऊया...
शरीर डिटॉक्स होते
प्रसिद्ध योगगुरू डॉ. हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे त्रिफळा चूर्णाबाबतची माहिती शेअर केलीय. त्रिफळा चूर्णमुळे पोट स्वच्छ होतेच शिवाय संपूर्ण शरीर देखील डिटॉक्स होते. आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन गोष्टी एकत्रित करून हे चूर्ण तयार केले जाते.
त्रिफळ पावडर खाण्याचे फायदे
योगगुरूंनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्रिफळा चूर्णामुळे पचनप्रक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते आणि जठराग्नी (Stomach Fire) देखील सक्रिय होतो. अन्नाचे पचन सहजरित्या होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
डिटॉक्सिफिकेशन
त्रिफळा चूर्णमधील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात, ज्यामुळे यकृताचेही आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. संपूर्ण शरीर डिटॉक्स झाल्यास शरीराची ऊर्जा वाढेल आणि त्वचेवरही ग्लो येईल.
वेटलॉस
हंसा योगेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिफळा चूर्णामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होऊन फॅट्स बर्न होतील. पौष्टिक आहारासह नियमित योगासनांचाही सराव करावा, यामुळेही वजन कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता, किती वेळ उन्हात बसावे? डॉक्टरांनी दिली माहिती)
निरोगी त्वचा
त्रिफळा पावडरमध्ये अँटी-ऑक्सिंड्टस आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळेल. त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
(नक्की वाचा: Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या)
त्रिफळा पावडर कधी आणि कशी खावी?
- डॉक्टर हंसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर मिक्स करा.
- यामुळे पचनप्रक्रिया सक्रिय होईल आणि सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होईल.
- वजन कमी करायचं असेल तर दिवसभरात दोनदा त्रिफळा चूर्णचे सेवन करावे.
- सलग तीन महिने त्रिफळ चूर्णाचे सेवन करू नये, अन्यथा अपाय होऊ शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world