Intestine Cleanse Therapy: पोट स्वच्छ होत नसल्याच्या समस्येमुळे हल्ली बहुतांश लोक त्रासलेले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे पौष्टिक आहाराचा अभाव. जास्त प्रमाणात तिखट आणि तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्याने आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. ज्यामुळे शौचाशी संबंधित समस्या निर्माण होतात. शारीरिक समस्या टाळण्यासाठी आतड्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. याबाबत सद्गुरूंनी सांगितलेले रामबाण उपाय जाणून घेऊया...
आतड्यांची स्वच्छता कशी करावी?
सद्गुरूंनी त्यांच्या यू-ट्युब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे सांगितलं की, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. त्याचप्रमाणे काही ठराविक गोष्टींचे सेवन केलं तर शौचाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. यासाठी डाएटमध्ये तीन गोष्टींचा समावेश करावा.
आतड्यांमधील घाण बाहेर पडण्यासाठी काय खावे?
कडुलिंब आणि हळद
सद्गुरूंनी सांगितलं की, सुरुवातीच्या काही दिवसांत कडुलिंब आणि हळदीचे सेवन करा. यासाठी कडुलिंबाची पाने वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करा. सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. कडुलिंबातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील हानिकारक जंतूंचा खात्मा होतो आणि पचनप्रक्रिया सुधारते. हळदीमुळे हा उपाय अधिक प्रभावी होतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
त्रिफळा चूर्ण
आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन गोष्टींचे मिश्रण म्हणजे त्रिफळा चूर्ण. या पावडरद्वारे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. सद्गुरूंच्या माहितीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी पाणी, दूध किंवा मधामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करून त्याचे सेवन करावे. यामुळे सकाळी पोट स्वच्छ होईल.
(नक्की वाचा: Weight Gain Causes: झोप येत नाहीय, मूड खराब आणि वजनही वाढतेय; शरीरात हे व्हिटॅमिन झालंय कमी)
एरंडेल तेल
सद्गुरूंनी एरंडेल तेलाचेही सेवन करण्याचा सल्ला दिलाय. कोमट स्वरुपातील अर्धा चमचा एरंडेल तेल पाणी किंवा दुधामध्ये मिक्स करुन प्यायल्यास शरीरामध्ये जमा झालेली घाण बाहेर फेकली जाण्यास मदत मिळेल. यामुळे आतड्यांची स्वच्छता होईल.
(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: पोटातील घाण सकाळी पटकन येईल बाहेर, फक्त खा ही आयुर्वेदिक पावडर)
या गोष्टींचीही काळजी घ्यावी
सद्गुरूंनी असेही सांगितलंय की, या तीन गोष्टींचे योग्य प्रमाणात सेवन करून दिवसातून दोनदा शौचास जावे. तसेच खाद्यपदार्थांच्या सेवनामध्ये पाच ते सहा तासंचे अंतर ठेवावे, जेणेकरून अन्नाचे पचन करण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळेल. हे उपाय केल्यास आतड्यांची स्वच्छता होईल शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

