Turmeric Water Benefits: रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी प्यावे? हळद किती वापरावी? आयुष्य बदलणारी IMP माहिती

Turmeric Water Benefits: प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यू-ट्युबवर चॅनेलवर हळदीच्या पाण्याशी संबंधित माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Turmeric Water Benefits: हळदीचे पाणी पिण्याचे फायदे"
Canva

Turmeric Water Benefits: भारतीय स्वयंपाक हळदीच्या वापराविना अपूर्णच आहे. जवळपास सर्वच पाककृतींमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे जेवणाची चव सुंदर होतेच शिवाय यातील पोषणतत्त्वांमुळे आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. हळदीतील आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळेच आरोग्य तज्ज्ञाने खाण्यासह हळदीचे पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यू-ट्युबवर चॅनेलवर हळदीच्या पाण्याचे फायदे सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये नेमके काय सांगितलंय, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे | Turmeric Water Benefits In Marathi

सांधेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी होते

डॉक्टर बर्ग यांनी सांगितले की, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक आहे, जे अतिशय शक्तिशाली अँटी-इन्फ्लेमेटरी कम्पाउंड आहे. कर्क्युमिऩ घटक सांधेदुखी, संधिवात आणि शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते.  

रक्तशर्करेची पातळी 

कित्येक संशोधनामधील माहितीनुसार हळदीतील कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यात मदत मिळते. विशेषतः टाइप 2 मधुमेहग्रस्तांसाठी हळदीचे पाणी पिणे वरदान ठरेल. शिवाय शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी कमी होऊन हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

नैराश्य आणि तणाव

कर्क्युमिनमुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन यासारख्या हॅपी हार्मोन्सचा स्त्राव होण्यास मदत मिळते. परिणामी मूड सुधारतो आणि गाढ-शांत झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी पिणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 

Advertisement

पचनप्रक्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती  

हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराची पचनप्रक्रिया सुधारेल. गॅस, अ‍ॅसिडिटी यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळेल. हळदीतील पोषणतत्त्वांमुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा होतो, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

हळदीचे पाणी कसे तयार करावे? | Haldi Water Recipe 

डॉक्टर बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लासभर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करा. चवीसाठी मध आणि लिंबाचा समावेश करू शकता.    

Advertisement

(नक्की वाचा: वेटलॉसपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत मिळतील असंख्य लाभ, सकाळी प्या हळदीचे पाणी)

हळदीचे पाणी पिण्याचे योग्य वेळ

पचनप्रक्रियेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी जेवणापूर्वी हळदीचे पाणी प्यावे. झोप, तणाव आणि रोगप्रतिकारकशक्तीशी संबंधित समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरेल.  

हळदीच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होईल, शरीरावरील सूज कमी होईल, मन शांत आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

(नक्की वाचा: Haldi For Skin: चेहऱ्यावर हळद लावणे सुरक्षित ठरेल? वाचा डॉक्टर काय म्हणाले...)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)