BP Control Tips: मानसिक ताण, खाण्यापिण्याच्या युकीच्या सवयी, कमी झोप यासारख्या गोष्टींमुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होणे सामान्य बाब आहे. विशेषतः हाय ब्लड प्रेशरची समस्या सायलेंट किलर मानली जाते. कारण यामुळे हृदय, मेंदू आणि किडनीवरही दुष्परिणाम होतात. आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या टाळण्यासाठी रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. औषधोपचारांव्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी फॉलो केल्यास बीपीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया....
बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा या 6 सवयी | How To Control BP Naturally
1. 45 मिनिटे चालावे
सकाळी ब्रिस्क वॉक केल्यास रक्तवाहिन्या लवचिक होण्यास मदत मिळेल. रक्तदाबाची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. दररोज एकटे चालल्यास सिस्टोलिक बीपी 8–10 mmHg ने कमी होऊ शकतो, असे संशोधनामध्ये निर्दशनास आलंय.
2. मीठ, सोडिअमयुक्त पदार्थ खाणे टाळा
बिस्किट, फरसाण, पापड, ब्रेड, इन्स्टंट सूप इत्यादी सोडिअमयुक्त पदार्थ खाणे टाळा.
3. सात तासांहून अधिक वेळ झोप घेणे
झोपण्याआधी तासाभरापूर्वी लॅपटॉप, मोबाइलचा वापर करणं टाळावं
4. पोटॅशिअमयुक्त आहार
डाएटमध्ये पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. भाज्यांचे प्रमाण वाढवा आणि भाताचे प्रमाण कमी करा.
केळी, पालक, मोड आलेले कडधान्यांचा डाएटमध्ये समावेश करावा.
(नक्की वाचा: Health News: घरीच बीपी चेक करता का? डॉक्टरांनी सांगितली Blood Pressure तपासण्याची योग्य पद्धत)
5. तणाव कमी करा
मानसिक ताण कमी करावा. श्वासोच्छवासाचे व्यायाम करा, मनातील विचार डायरीमध्ये मांडा, फोनचा वापर न करता दहा मिनिटे चाला; अशा गोष्टी केल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Blood Pressure High झाल्यास गरम की थंड पाण्याने आंघोळ करावी? डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय)
6. दिवसातून दोनदा बीपी तपासा आणि नोंद करा
नियमित दिवसभरातून दोनदा बीपी तपासा. रेटिंगची नोंद करुन ठेवावी. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक ते बदल केल्यास बीपीची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळेल आणि बीपी नियंत्रणासाठी औषधांचा आधार घेण्याची आवश्यकता लागणार नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)