जाहिरात

Health News: फुफ्फुसं ‘Silent Mode’ मध्ये जातात! COPD चे लपलेले ‘ते’ लक्षण समोर

सततचा खोकला कधीच “सामान्य” नसतो. तो शरीराचा इशारा असतो.

Health News: फुफ्फुसं ‘Silent Mode’ मध्ये जातात! COPD चे लपलेले ‘ते’ लक्षण समोर
  • COPD चा प्रसार प्रदूषण आणि रासायनिक संपर्कही कारणीभूत आहेत
  • COPD हा एकत्रित क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसेमा या फुफ्फुसांच्या आजारांचा प्रकार असून श्वास घेणे कठीण होते
  • भारतात प्रदूषण, धूळ-धूर आणि बायोमास इंधनामुळे COPD होण्याचा धोका जास्त आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

धूम्रपान करणाऱ्यांमध्ये COPD चे सुमारे 80–90% रुग्ण दिसतात. पण हवेचे प्रदूषण, धूळ-धूर, रसायनांचा संपर्क आणि स्वयंपाकासाठी वापरले जाणारे बायोमास इंधन  हेही तितकेच महत्त्वाचे कारण आहे. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (COPD) ला अनेकदा “स्मोकरचा खोकला” म्हणून दुर्लक्षित केले जाते. पण हा गैरसमज या आजाराचे खरे गांभीर्य लपवतो. COPD हा एकच आजार नसून, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसेमा यांचा एकत्रित परिणाम आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये फुफ्फुसांवर हळूहळू परिणाम होतो आणि श्वास घेणे अधिकाधिक कठीण होत जाते. धूम्रपान हे प्रमुख कारण असले तरी, न धूम्रपान करणाऱ्यांनाही COPD होऊ शकतो.

भारतभर हिवाळ्यात वाढणारे प्रदूषण, खराब AQI आणि धुरकट वातावरण यामुळे दीर्घकाळ चालणारा खोकला हा केवळ तात्पुरता त्रास नसून गंभीर समस्येचे लक्षण असू शकतो. असं  वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलचे कन्सल्टंट पल्मनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी COPD बद्दल सांगतात. COPD च्या बहुतांश रुग्णांमध्ये धूम्रपान हे कारण असले तरी भारतासारख्या देशात हवेचे प्रदूषण, कामाच्या ठिकाणी धूळ-धूर-रसायनांचा संपर्क, आणि बायोमास इंधन असे विविध घटक मुख्य भूमिका बजावतात. या घटकांचा दीर्घकाळ संपर्क फुफ्फुसात सूज निर्माण करतो, ऊतकांचे नुकसान करतो आणि त्यामुळे ऑक्सिजनची देवाणघेवाण मंद होते. अपुरे वायुवीजन असलेल्या घरांत राहणाऱ्या महिलांना या धोका अधिक प्रमाणात दिसतो.

लवकर दिसणारी लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात
सतत खोकला येणे, श्वास लागणे, चालताना दम लागणे, घरघर, थकवा ही सुरुवातीची चिन्हे अनेकदा “वय झाले”, “हवामान बदलले”, “स्मोकरचा खोकला आहे” म्हणून दुर्लक्षित केली जातात. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसे COPD वाढते आणि दैनंदिन कामे अगदी काही पावले चालणे किंवा जिना चढणेही कठीण बनते. अनेकजण खोकला आणि कफ याला खूपच सामान्य लक्षण समजतात आणि सक्रिय फुफ्फुसनुकसान झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात.

COPD कशी ओळखली जाते आणि कशी व्यवस्थापित करता येते?
डॉ. सुलेमान लधानी सांगतात की, COPD ची खात्री स्पायरोमेट्री या फुफ्फुस कार्यक्षमतेच्या चाचणीने केली जाते. COPD पूर्णपणे बरा होत नाही. पण योग्य वेळी ओळखल्यास तो पूर्णतः नियंत्रणात ठेवता येतो. धूम्रपान सोडणे हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. लवकर धूम्रपान सोडल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता काही प्रमाणात सुधारू शकते. पण ऊतकांचे नुकसान खूप वाढले असेल तर ती भरपाई शक्य नसते आणि काहीवेळा दीर्घकालीन ऑक्सिजन थेरपीची गरज भासू शकते.

उपचार आणि जीवनशैली व्यवस्थापन

  • COPD चा उपचार हे उद्दिष्ट ठेवून केला जातो 
  • * फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारणे
  • * श्वसन लक्षणे कमी करणे
  • * तीव्र त्रास (exacerbations) टाळणे

यासाठी ब्रॉन्कोडायलेटर, इनहेल्ड स्टेरॉइड्स यांसारखी औषधे उपयुक्त ठरतात. पल्मनरी रिहॅबिलिटेशन — ज्यात व्यायाम, श्वसन तंत्र, आणि आरोग्य शिक्षण असते — हे रुग्णांच्या सहनशक्ती आणि जीवनाच्या दर्जात मोठा फरक घडवते. गंभीर अवस्थांमध्ये ऑक्सिजन थेरपी किंवा शस्त्रक्रियाही आवश्यक ठरू शकते. COPD असतानाही जीवन उत्तम जगता येते. COPD हळूहळू वाढत जाणारा आजार असला तरी, लवकर निदान आणि योग्य काळजी मोठा बदल घडवतात.

जीवनशैलीत केलेले काही बदल रोग नियंत्रणात ठेऊ शकतात:

  • * तंबाखू पूर्णपणे टाळणे
  • * हवेतील प्रदूषकांपासून दूर राहणे
  • * घरात चांगले वायुवीजन ठेवणे
  • * पौष्टिक आहार
  • * नियमित व्यायाम
  • * फ्लू आणि न्यूमोनीया लस घेणे

शेवटचा महत्त्वाचा संदेश

सततचा खोकला कधीच “सामान्य” नसतो. तो शरीराचा इशारा असतो. COPD बरी होत नसली तरी योग्य जागरूकता, वेळेवर उपचार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे हा आजार सहजपणे नियंत्रणात ठेवता येतो  आणि रुग्ण फक्त जगत नाहीत, तर चांगले जगू शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com