- शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला
- शरद पवार यांना 9 फेब्रुवारी रोजी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
- शरद पवार सतत खोकला आणि श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांचा सामना करत होते
Sharad Pawar Health News: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून शनिवारी (14 फेब्रुवारी) डिस्चार्ज देण्यात आलाय. छातीत संसर्ग (Chest Infection) आणि श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
बारामतीतून पुण्यात तातडीने हलवण्यात आले होते | Pune News Sharad Pawar
9 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. वाढते वय आणि प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता, त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या आणि उपचार करण्यात आले.
डॉक्टरांनी दिली शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती
रुबी हॉल क्लिनिकचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, "शरद पवार यांच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा झाली आहे. म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पुरेशा प्रमाणात आराम करण्याचा सल्ला दिलाय, यानंतर हळूहळू ते आपली दैनंदिन कामं करू शकतील आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होऊ शकतील".
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: वरिष्ठ नेत्यांचीही तीच मागणी, माझा लढा कायम राहील; अमोल मिटकरी तो दावा फेटाळून लावला)
पवार कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या धक्क्यातून सावरत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी तोंडाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरही यशस्वी मात केलीय, त्यामुळे त्यांच्या जिद्दीची नेहमीच चर्चा होत असते.
सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट शेअर करत दिली मोठी माहिती
आदरणीय पवार साहेब यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतील. साहेबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल…
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2026
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, आक्रमक भूमिकेस सुनेत्रा पवारांची सहमती? सूत्रांची मोठी माहिती)
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच देशभरातील विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांना डिस्चार्ज मिळाल्याचे वृत्त समोर येताच समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शरद पवार यांना पुण्याच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world