जाहिरात

Salim Khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान ICU मध्ये दाखल, प्रकृतीत बिघडल्याने डॉक्टरांचा मोठा निर्णय

Salim Khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत.

Salim Khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान ICU मध्ये दाखल, प्रकृतीत बिघडल्याने डॉक्टरांचा मोठा निर्णय
"Salim Khan Health Updates: सलीम खान यांच्या आरोग्याबाबत मोठी माहिती"
IANS English

Salim Khan Health Update: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan News) यांना मंगळवारी (17 फेब्रुवारी) मुंबईतील लीलावती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. सलीम खान यांच्या शरीरावर सूज आल्याची तक्रार होती, यानंतर डॉक्टरांनी त्यांना देखरेखीअंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी मिळताच कुटुंबातील सदस्य तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सलमान खान आणि मुलगी अलविरा खान देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.  

सलमान खानने अर्ध्यातच सोडलं शुटिंग | Salman Khan News

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान मढ परिसरात सुरू असलेले शुटिंग अर्ध्यातच सोडून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलीन खान यांचा बॉलिवूडमधील प्रवास | Salim Khan Bollywood Journey 

हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांचे नाव अशा लेखकाच्या रूपात नोंदवले गेले आहे, ज्यांनी सिनेमाची भाषा आणि नायकाची प्रतिमेला नवीन दिशा दिली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अभिनयाने केली होती. 1960च्या दशकात त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, पण त्यांना हवी तशी ओळख मिळाली नाही. याच काळात त्यांना जाणीव झाली की अभिनय नव्हे, तर लेखन ही त्यांची खरी ताकद आहे. त्यानंतर त्यांनी पटकथा लेखनाकडे पाऊल वळवले आणि येथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला.

(नक्की वाचा: Salman Khan: RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानच्या उपस्थितीचं कारण काय? जाणून घ्या पडद्यामागची 'रिअल स्टोरी')

'सलीम-जावेद'ची लोकप्रिय जोडी | Salim Khan News

लेखनाच्या जगात सलीम खान यांचे नशीब तेव्हा बदलले जेव्हा गीतकार जावेद अख्तर यांच्याशी त्यांची जोडी जमली. ही जोडी 'सलीम-जावेद' या नावाने प्रसिद्ध झाली. या दोघांनी मिळून अशा कथा आणि संवाद लिहिले, ज्यांनी प्रेक्षकांची वाहवाई मिळवली आणि बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड केले. 

सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या सिनेमांमध्ये 'जंजीर', 'दीवार', 'शोले' आणि 'डॉन' यासारख्या धमाकेदार सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील राग, संघर्ष आणि अपेक्षा मोठ्या पडद्यावर उतरवल्या. 'जंजीर' आणि 'दीवार' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन' ही ओळख मिळवून दिली. दरम्यान आज जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा संपूर्ण चित्रपट सृष्टी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असून सलीम खान लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करत आहे.

(Content Source IANS)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com