Vitamin B12चा खजिना आहेत ही छोटीशी पाने, अंडी-चिकनपेक्षाही पावरफुल

Vitamin B12 Deficiency: अंडी आणि चिकनचे तुम्ही सेवन करत नसाल आणि व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यास पौष्टिक पर्याय शोधत आहात का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12चा खजिना आहे ही भाजी

Health News: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शाकाहारी लोकांना अक्षरशः पर्याय शोधावे लागतात. कारण प्रोटीनची, व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी मांसाहार पदार्थ सर्वात उत्तम स्त्रोत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की शाकाहारी लोक त्यांचे शरीर निरोगी ठेवू शकत नाहीत. निसर्गाने आपल्याला कित्येक गोष्टी दिल्या आहेत, ज्यामध्ये मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त प्रमाणात पोषणतत्त्वांचा समावेश आहे. तुम्हाला देखील निरोगी राहायचं असेल आणि व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करायची असेल तर डाएटमध्ये मोरिंग्याच्या पानांचा समावेश करू शकता. मोरिंग्याचा डाएटमध्ये कसा समावेश करायचा आणि व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊया...

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणे (Symptoms of Vitamin B12 Deficiency)

  • शारीरिक थकवा
  • कमकुवतपणा जाणवणे
  • मानसिक ताण
  • मज्जासंस्थेशी संबंधित समस्या
  • अ‍ॅनिमिया  

(नक्की वाचा: Linguda Benefits: बीपीपासून ते पचनप्रक्रियेसाठी वरदान आहे विचित्र दिसणारी हिरवी भाजी, तुम्हाला माहितीय का नाव?)

मोरिंगा पावडरमध्ये व्हिटॅमिन B12चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे लोक मांसाहार करत नाही, त्या लोकांसाठी मोरिंगा पावडरचे सेवन करणे सर्वोत्तम उपाय मानला जातो. कारण मोरिंगामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक, फ्लेवेनॉइड्स, पॉलिफेनोल्स आणि ग्लुकोसाइनोलेट्स यासारख्या अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे.
जे शरीर निरोगी ठेवण्यास पोषक मानले जातात.

(नक्की वाचा: Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका)

मोरिंग्याचे सेवन कसे करावे? (How To Consume Moringa)

  • व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी मोरिंग्याचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. 
  • मोरिंगा पावडर पाणी किंवा दुधामध्ये मिक्स करू शकता. 
  • मोरिंग्याच्या पानांची भाजी देखील करून खाऊ शकता.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )