Nasya Therapy: आयुर्वेदानुसार नाकामध्ये तेल सोडण्याचा उपाय केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील, या प्रक्रियेस 'नस्य थेरपी' (Nasya Therapy) असे म्हणतात. NDTVशी बातचित करताना आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रताप चौहान यांनी सांगितलं की, नस्य थेरपीचा हजारो वर्षांपूर्वीपासून वापर केला जातोय. हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे. कोमट स्वरुपातील औषधी तेलाचे काही थेंब नाकामध्ये सोडले जातात. यानंतर कपाळ, गाल आणि सायनसची समस्या असणाऱ्या भागाचा हलक्या हाताने मसाज केला जातो.
नाकामध्ये तेल सोडण्याचे फायदे
नाक मोकळे होते
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, नस्य थेरपीच्या मदतीने श्वासोच्छवासातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. सायनसची समस्या, वारंवार श्वास घेताना अडथळे येणे किंवा एखाद्या अॅलर्जीमुळे त्रस्त असाल तर हा उपाय करावा.
श्वासोच्छवासाची प्रक्रिया
नियमित स्वरुपात नस्य थेरपी केल्यास नाकाच्या आतील भागातील कोरडेपणा कमी होईल आणि श्वसनातील अडथळे दूर होतील.
घोरणे कमी होईल
आयुर्वेदाचार्य चौहान यांच्या माहितीनुसार, घोरण्याची समस्याही कमी होऊ शकते.
(नक्की वाचा: Hair Care Tips: नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास काय होईल? केस पटापट वाढतील?)
ताण कमी होईल
डॉक्टर चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिक ताण कमी करण्यासाठीही नस्य थेरपी हा रामबाण उपाय आहे. नाकामध्ये तेल सोडून हलक्या हाताने मसाज केल्यास मेंदूवरील ताणही कमी झाल्यासारखे वाटेल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.
आयुर्वेदामध्ये नस्य थेरपीसाठी साधारणतः अणुतेल आणि शदबिंदु तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. या दोन्ही तेलांमुळे श्वसननलिका स्वच्छ होण्यास मदत मिळते, नाकाच्या आतील भागातील सूज कमी होते आणि डोक्याशी संबंधित विकारांपासून आराम मिळतो. कोणतेही तेल वापरण्यापूर्वी, तुमच्या समस्येनुसार आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय)
नस्य थेरपी कशी करावी?सकाळी रिकाम्या पोटी, स्नान केल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी नस्य थेरपी करणे सर्वाधिक चांगले मानले जाते. सुरुवातीस गरम पाण्याने चेहऱ्यावर वाफ घ्यावी, यानंतर झोपावे आणि नाकामध्ये कोमट तेलाचे दोन ते तीन थेंब सोडावे. यानंतर काही वेळ आराम करावा आणि चेहऱ्याचा हलक्या स्वरुपात मसाज करावा, यानंतर आराम करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)