जाहिरात

Hair Care Tips: नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास काय होईल? केस पटापट वाढतील?

Hair Care Tips: नारळाचे तेल आणि कांद्याचा रस दोन्हीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल तसेच अँटी-फंगल गुणधर्मांचा समावेश आहे. यामुळे केसांची वाढ होते का? जाणून घेऊया माहिती...

Hair Care Tips: नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास काय होईल? केस पटापट वाढतील?
"Hair Care Tips: नारळ तेल आणि कांद्याच्या रसाचे फायदे"
Canva

Hair Care Tips: आपले केस लांबसडक, मजबूत आणि चमकदार असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. काळेभोर आणि घनदाट केसांमुळे सौंदर्यातही भर पडते. पण धकाधकीचं जीवन, प्रदूषण, चुकीच्या लाइफस्टाइलमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. हेअर केअर रुटीनमध्येही काही बदल केल्यास केस सुंदर होतील. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय जाणून घेऊया... कांद्याचा रस आणि नारळाचे तेल एकत्रित करून केसांना लावल्यास काय होईल? केसांमध्ये कोणते बदल होतील? 

कांद्याचा रस आणि नारळाच्या तेलाचे फायदे

कांद्याचा रस आणि नारळाच्या तेलामुळे केसांना अँटी- बॅक्टेरिअल,अँटी फंगल गुणधर्मांचा पुरवठा होईल. कांद्यामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल, तर नारळ तेलामुळे केसांना मॉइश्चरायझर मिळेल. कांद्याचा रस आणि नारळ तेल एकत्रित मिक्स करून लावल्यास केसगळती कमी होईल, केस चमकदार होतील आणि केस मुळासकट मजबूत होतील.  

Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय

(नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय)

कसा करावा उपाय?

दोन मोठे चमचे कांद्याचा रस आणि दोन मोठे चमचे तेल एकत्रित करा. 
स्कॅल्पवर हे मिश्रण लावून हलक्या हाताने मसाज करा. 
30 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावे. 

Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही)

याव्यतिरिक्त दोन मोठे चमचे कांद्याचा रस आणि दोन मोठे चमचे तेल एका भांड्यामध्ये गरम करा. 
तेल थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये भरा. 
तुमच्या आवश्यकतेनुसार तेल केसांना लावा आणि 45 मिनिटांनंतर केस धुऊन घ्या. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com