Apple For Diabetes: मधुमेहामध्ये सफरचंद खावं की खाऊ नये? रक्तशर्करेच्या पातळीवर काय होईल परिणाम, जाणून घ्या

Apple For Diabetes: सफरचंद फळामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. रोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही, असे म्हटलं जाते. ही म्हण मधुमेहग्रस्तांच्या बाबतीतही लागू होते का? जाणून घेऊया माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
Apple For Diabetes: सफरचंद खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी वाढते का?

Apple For Diabetes:  मधुमेह आजार उद्भवल्यास डाएटची प्रचंड काळजी घ्यावी लागते. यामागील मुख्य कारण म्हणजे रक्तशर्करेची पातळी प्रभावित होऊ नये. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू नये, यासाठी तज्ज्ञमंडळी रुग्णांना आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि करू नये; याचा सल्ला देतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण कित्येक पदार्थांचे सेवन करतो, ज्याचा रक्तशर्करेवर काय परिणाम होऊ शकतात, हे आपल्याला माहीत नसते. यापैकीच एक गोष्ट म्हणजे सफरचंद, जे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मधुमेहाची समस्या असल्यास सफरचंद खाणे योग्य ठरेल का? सफरचंद खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी वाढेल का? तज्ज्ञमंडळींचे याबाबत काय म्हणणं आहे, जाणून घेऊया सविस्तर...

सफरचंद खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी वाढते का? (What Effect Does Eating Apples Have on Blood Sugar Levels?)

मधुमेह हा एक असा आजार ज्यामध्ये शरीरातील रक्तशर्करेची पातळी सामान्य स्थितीपेक्षा जास्त असते. यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींची प्रचंड काळजी घ्यावी लागते. विशेषतः फळांच्या बाबतीत मधुमेहग्रस्तांमध्ये प्रचंड गोंधळ असतो. अशातच सफरचंद खाणे योग्य की अयोग्य, असाही प्रश्न मधुमेहग्रस्त वारंवार विचारत असतात. 

सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मधुमेहग्रस्तांना वाटते की या फळामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्तशर्करेची पातळी वाढते. सफरचंद खाल्ल्यास रक्तशर्करेच्या पातळीवर किती परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊया माहिती...

मधुमेहग्रस्तांनी सफरचंद खाणे योग्य की अयोग्य? (Is it Safe to Eat Apple In Diabetes or Not?)

सफरचंद खाणे मधुमेहग्रस्तांकरिता आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षित ठरू शकते. पण मर्यादित स्वरुपातच सफरचंद खावे, कारण यामध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) असते. शिवाय सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्मही आहेत. सफरचंदाचे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जवळपास 36 असते, जो कमी मानला जातो. याचा अर्थ सफरचंद खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी अचानक नव्हे तर हळूहळू वाढते. 

Advertisement

सफरचंद खाण्याचे मधुमेहग्रस्तांसाठी फायदेशीर? (Benefits of Eating Apple in Diabetes)

  • सफरचंदामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 
  • सफरचंदांतील फ्लेवेनॉइड्स आणि पॉलीफेनॉल या अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत देखील टाळता येतात. 
  • सफरचंदामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. 
  • हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद खाणे फायदेशीर ठरेल. कारण यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Apple Benefits: रोज 1 सफरचंद खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?)

सफरचंद खाताना या गोष्टींची काळजी घ्यावी

  • सफरचंद सोलून खाऊ नये, कारण फळाच्या सालीमध्येही फायबर आणि पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 
  • सफरचंदाचा ज्युस पिणे टाळावे, कारण ज्युसमध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते.  
  • दिवसभरात एक मध्यम आकाराचे सफरचंद खाणे पुरेसे आहे.  
  • रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ नये, नाश्ता किंवा जेवणामध्ये सफरचंदाचा समावेश करू शकता.  

(नक्की वाचा: लाल की हिरवे, कोणते सफरचंद आरोग्यासाठी आहे फायदेशीर?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)