Soaked Raisin Benefits In Marathi: डाएटमध्ये सुकामेव्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून आवर्जून दिला जातो. सुकामेव्यातील मनुक्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लाभदायक मानले जाते. कारण चांगल्या चवीसह मनुक्यांमध्ये पोषणतत्त्वांचा खजिनाही मोठ्या प्रमाणात आहे. कित्येक खाद्यपदार्थांमध्येही मनुक्यांचा आवर्जून वापर केला जातो.
मनुक्यातील पोषणतत्त्वांची माहिती
लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. यामुळे कित्येक गंभीर समस्यांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळते. नियमित भिजवलेले मनुके खाल्ल्यास शरीराला कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...
भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे (Soaked Raisin Benefits In Marathi)
1. वजन वाढवण्यास उपयोगी
तुम्ही देखील वजन वाढण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सलग महिनाभर भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करू शकता. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराचे वजन वाढण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Raisins Benefits: भिजवलेले की सुके मनुके, कोणता पर्याय आहे फायदेशीर?)
2. रक्ताची कमतरता दूर होईल
महिलांच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. कामांमध्ये व्यस्त असल्याने महिला त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. घर आणि ऑफिसमधील कामांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे त्यांना शक्य होत नाही. तुम्ही देखील शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असल तर भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करा. लोहाचे उत्तम स्त्रोत म्हणजे मनुके.
(नक्की वाचा: काळे की पिवळे, कोणते मनुके खाणे ठरेल फायदेशीर?)
3. पोटाचे आरोग्य
पोटाशी संबंधित समस्यांपासून त्रस्त असाल तर रोज सकाळी भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करा. मनुक्यांमध्ये फायबरचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
4. त्वचेवर येईल तेज
नियमित भिजवलेले मनुके खाल्ल्यास त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. कारण यातील पोषणतत्त्व त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )