Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद

Acidity Bloating Relief Tips: आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी पोटातील गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तीन रामबाण उपाय सांगितले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: पोटातील गॅसपासून कशी सुटका मिळावावी?
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे पचनप्रक्रियेत बिघाड होऊन पोट फुगणे आणि अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते
  • आले पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असून त्याचा रस मध आणि लिंबासह घेतल्यास गॅस आणि फुगण्याची समस्या कमी होईल
  • पुदिन्याच्या पानांचा रस प्यायल्यास पोटाच्या स्नायूंना आराम मिळेल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Acidity Bloating Relief Tips: अयोग्य जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणं सामान्य बाब आहे. पचनप्रक्रिया बिघडल्यास पोटात गॅस होणे, पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. काही लोकांचे काहीही खाल्लं तरी पोट फुगते आणि पोटात गॅस होतो. वरवर पाहता या समस्या सामान्य वाटत असल्या तरीही याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊया...

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांच्या माहितीनुसार पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये दही, आले आणि पुदिना यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करू शकता.

आले

पचनप्रक्रियेसाठी आले लाभदायक मानले जाते. आल्यामध्ये पचनास मदत करणाऱ्या गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आल्याचे योग्य प्रमाणात सेवन केलं तर गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील. एक कप पाण्यात आल्याचा छोटा तुकडा किसून मिक्स करा. पाणी पाच-10 मिनिटे उकळा. थंड झाल्यानंतर पाणी गाळा, त्यामध्ये थोडेसे मध आणि लिंबू मिक्स करू शकता.

पुदिना

पुदिन्यातील पोषणतत्त्वांमुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि गॅस बाहेर येण्यास मदत मिळते. पुदिन्याची ताजी पानं गरम पाण्यात काही वेळासाठी ठेवा. थोड्या वेळाने पाणी गाळून प्यावे. पुदिन्याच्या पानांचा रस करूनही पिऊ शकता.

Advertisement

(नक्की वाचा: Chana Benefits: भिजवलेले चणे खाल्ल्यास वजन वाढते की घटते? 1 दिवसात किती प्रमाणात करावे सेवन? वाचा माहिती)

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण अधिक असते म्हणजे पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांचा दह्यात समावेश असतो, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते. जेवणानंतर एक वाटी ताजे दही खावे. याव्यतिरिक्त ताकही पिऊ शकता, त्यामध्ये चिमूटभर काळे मीठ आणि जीरा पावडर मिक्स करा.

Advertisement

(नक्की वाचा: Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article