Turati Benefits For Teeth: दातांचा पिवळेपणा या पांढऱ्या दगडाने होईल दूर? कसा करायचा वापर, वाचा माहिती

Turati Benefits For Teeth: तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हीही नैसर्गिक उपाय शोधत आहात का? तर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा...

जाहिरात
Read Time: 2 mins
"दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरा हा पांढरा दगड"

Turati Benefits For Teeth: दातांचा पिवळेपणा, तोंडाला येणारा दुर्गंध आणि हिरड्यांचे दुखणे या समस्या सामान्य आहेत. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारामध्ये कित्येक महागडे माउथवॉश आणि टुथपेस्ट उपलब्ध आहेत. पण हे उपाय प्रभावी ठरतीलच असे नव्हे. तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर नैसर्गिक उपचार पद्धतींचा वापर करू शकता. यापैकी एक उपाय म्हणजे तुरटीचा वापर. तुरटीच्या वापरामुळे तोंडाचे आरोग्य निरोगी कसे राहील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

तुरटी वापरण्याचे फायदे (Turati Benefits In Marathi)

प्रसिद्ध डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर तुरटीच्या फायद्यांची माहिती सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये डॉ. जैदी सांगत आहेत की, जर्नल ऑफ क्लिनिकल अँड डायग्नोस्टिक रीसर्चमध्ये (JCDR) प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात आणि हिरड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, यामुळे तोंडामधील जंतूंचा खात्मा होण्यास मदत मिळते.  

(नक्की वाचा: Cavities Treatment: दाताला कीड लागलीय? जाणून घ्या 5 रामबाण उपाय)

तुरटीचा वापर केल्यास कोणकोणते फायदे मिळतील?

  • दातांच्या पिवळेपणाची समस्या कमी होईल. 
  • हिरड्यांचे दुखणे कमी होईल. 
  • तोंड येण्याच्या समस्येतून सुटका मिळेल.   
  • तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल.

तुरटीचा वापर कसा करावा?

  • सर्वप्रथम अर्ध्या ग्लास कोमट पाण्यामध्ये तुरटीची चिमूटभर पावडर मिक्स करावी. 
  • तुरटीच्या पाण्याने एक-दोन वेळा गुळण्या करा.  
  • चुकूनही तुरटीचे पाणी पिऊ नये.  
  • तुरटीच्या पाण्याने रोज गुळण्या केल्यास तुम्हाला लवकरच स्वतःमध्ये फरक जाणवेल.  

(नक्की वाचा: Yellow Teeth Remedies: पिवळे दात मोत्यांप्रमाणे चमकतील, करा हे घरगुती उपाय)

तुरटीच्या पाण्याचा वापर करताना या गोष्टींचीही काळजी घ्यावी

  • व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरटीच्या पाण्याने केवळ गुळण्या कराव्या. तुरटीने दात घासू नये. 
  • हिरड्यांचे दुखणे मोठ्या प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  • लहान मुलांसाठी तुरटीचे पाणी तयार करताना तुरटीचा जास्त वापर करू नये.
  • तुरटीच्या वापरामुळे दातांवर चमकही येईल.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)