Beetroot Juice Benefits In Marathi: फळांप्रमाणे डाएटमध्ये वेगवेगळ्या भाज्या तसेच फळांच्या ज्युसचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण सलग 15 दिवस बीट ज्युस (Beetroot Juice Benefits) प्यायल्यास शरीराचे कोणकोणत्या समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल? हे तुम्हाला माहितीये का. बीट हे एक कंदमूळ आहे, याचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. डाएटमध्येही या कंदमुळाचा विविध पद्धतींनी समावेश केला जाऊ शकतो. बीटमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, लोह, फॉलेट, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन सीसह कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. यातील सर्व घटक आरोग्यासाठी पोषक आहेत. सलग 15 दिवस बीट ज्युस प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतील? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
बीट ज्युस पिण्याचे फायदे (Benefits Of Beetroot Juice)
वजन घटवण्यासाठी लाभदायक
तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारामध्ये बीट ज्युसचा समावेश करू शकता. बीटमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फॅट्स देखील जास्त प्रमाणात नसतात. त्यामुळे बीट ज्युस प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Beetroot Side Effects: बीट जास्त प्रमाणात खाताय? तर होतील हे गंभीर आजार)
Photo Credit: Canva
त्वचेवर येईल नैसर्गिक तेज
बीटमध्ये (Beetroot Juice Benefits) अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते, यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळू शकते. त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Boiled Beet Benefits: बीट उकडून खाण्याचे फायदे)
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल
बिटामध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
यकृताचे आरोग्य निरोगी राहते
बीट ज्युस प्यायल्यास यकृताला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )