जाहिरात

लिंबू पाण्यात फक्त एक चमचा आलं मिक्स करा अन् ते पाणी प्या..'या' समस्या होतील दूर, योग्य वेळ कोणती?

आपल्या स्वयंपाकघरातच असे नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात आणि शरीरावर याचा साईड इफेक्टही होत नाही.

लिंबू पाण्यात फक्त एक चमचा आलं मिक्स करा अन् ते पाणी प्या..'या' समस्या होतील दूर, योग्य वेळ कोणती?
Ginger And Lemon Water
मुंबई:

Ginger and Lemon for Health: रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक छोट्या मोठ्या आजारांसाठी औषधांवर अवलंबून राहतात.पण आपल्या स्वयंपाकघरातच असे नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात आणि शरीरावर याचा साईड इफेक्टही होत नाही. आलं आणि लिंबू पाण्यानेही काही आजारांवर मात केली जाते. याचं छोटसं मिश्रण शरीराला डिटॉक्स करतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. लिंबाचं आणि आल्याचं मिश्रण बनवणं खूप सोपं आहे आणि शरीराला याचा फायदाही लगेच होतो.आल्यात मोठ्या प्रमाणात एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात.तर लिंबू पाण्यात व्हिटॅमीन सी चं प्रमाण अधिक असतं. जे शरीराची स्वच्छता करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.जर रोज एक चमचा आले-लिंबाचा रस योग्य पद्धतीने घेतला, तर अनेक आजार औषधांशिवायच नियंत्रणात येऊ शकतात.

आलं आणि लिंबू पाणी पिण्याचे फायदे कोणते?

1. पचनाशी संबंधित आजार

आले आणि लिंबू हे दोन्ही पचनसंस्थेसाठी अमृत मानले जातात. याचं सेवन केल्यावर गॅस,अपचन, मळमळ आणि पोटात गोळे येणे यांसारख्या समस्या दूर होतात. तसच पचनक्रिया सुधारते आणि अन्नपचन नीट होतं. 

2. लठ्ठपणा आणि मेटाबॉलिझम

आलं आणि लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होते. आले मेटाबॉलिझ्म वेगाने वाढवते आणि लिंबू पाण्यामुळे शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर पडते. याच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहते आणि पोटाची सूजही कमी होते.

नक्की वाचा >> Buttermilk: ताक 'या'आजारांसाठी रामबाण उपाय! ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहितच नाही

3. सर्दी-खोकला आणि घशातील खरखर

आल्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात आणि लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.घशातील आवाज बसणे, खरखर, खोकला, कफ आणि सुरुवातीचा सर्दीचा त्रास यामध्ये हे मिश्रण त्वरित आराम देते.

4. शरीरातील टॉक्सिन्सची स्वच्छता

हे एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंकसारखे काम करते. शरीरात साचलेले हानिकारक घटक बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते, फुफ्फुसांवरील ताण कमी होतो आणि शरीर हलके वाटते.

नक्की वाचा >> Research Study: 21 सेकंद लघवी करण्याचा नियम काय आहे? निरोगी राहायचंय? मग वाचा याचे जबरदस्त फायदे

सेवन करण्याची योग्य पद्धत आणि वेळ

  • एक चमचा  आल्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
  • जर चव तिखट वाटली,तर एक कप कोमट पाण्यात मिसळूनही पिऊ शकता.
  • खोकला किंवा कफ असल्यास यात एक चमचा मध घालून घ्या,त्वरित आराम मिळेल.
  • उत्तम परिणामांसाठी हे रोज 10–15 दिवस सतत प्या.
  • आले आणि लिंबाचे हे छोटंसं मिश्रण अनेक आजारांपासून बचाव करते आणि शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत बनवते. हे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेणे अत्यंत गरजेचे आहे,जेणेकरून याचा पूर्ण लाभ मिळू शकेल.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com