 
                                            Coriander Water Benefits: स्वयंपाकघरातील गरम मसाल्यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढतेच शिवाय यातील पोषणत्त्तवांमुळे आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. आताच्या बदलत्या लाइफस्टाइलनुसार लोक गरम मसाल्यातील धण्याचा डाएटमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात समावेश करू लागले आहेत. धण्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. धण्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
धण्याचे पाणी कसे तयार करावे? (How To Make Coriander Water | How To Make Dhania Water)
- रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यामध्ये दोन चमचे धणे भिजत ठेवा.
- सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळा आणि रिकाम्या पोटी प्या.
- तुम्हाला हवे असल्यास धण्यासकट पाणी करा आणि गाळून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून ते पाणी प्यावे.
धण्याचे पाणी पिण्याचे फायदे (Dhania Water Beneifts| Coriander Water Benefits)
1. किडनी:
धण्याचे पाणी प्यायल्यास किडनी डिटॉक्स होईल आणि शरीरातील हानिकारक घटक बाहेर फेकले जातील. किडनी डिटॉक्स करायची असेल तर धण्याचे पाणी पिणे सर्वोत्तम उपाय ठरेल.

2. त्वचा:
धण्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा डिटॉक्स होईल आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येईल. पिंपल्स, ब्लॅकहेड्स, रॅशेज यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
3. पचनप्रक्रिया:
धण्याचे पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया मजबूत होईल. यातील पोषणतत्त्वांमुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस यासारख्या समस्या दूर होतील.
(नक्की वाचा: Intestine Cleanse Therapy: आतड्यांमधील घाण सहजरित्या बाहेर कशी निघेल? Sadhguru यांनी सांगितले 3 रामबाण उपाय)
4. लठ्ठपणा:
वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर धण्याचे पाणी पिणे हा आरोग्यवर्धक पर्याय ठरेल.
(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: पोटातील घाण सकाळी पटकन येईल बाहेर, फक्त खा ही आयुर्वेदिक पावडर)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world


